एनसीसी व हिरवांकुर तर्फे धनाजी नाना महाविद्यालयात वृक्षारोपण भुसावळ येथील पर्यावरण प्रेमी प्रा डॉ दयाघन राणे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण...
एनसीसी व हिरवांकुर तर्फे धनाजी नाना महाविद्यालयात वृक्षारोपण
भुसावळ येथील पर्यावरण प्रेमी प्रा डॉ दयाघन राणे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- यावल शब्बीरखान सरवरखान
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिवसाच्या औचीत्याने वृक्षारोपण करण्यात आले.
१८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल अभिजीत महाजन, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी. वाघुळदे व हिरवांकुर फाउंडेशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष निलयबाबू शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील पर्यावरण प्रेमी प्रा डॉ दयाघन राणे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरवांकुर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सत्तावीस तालुक्यातील न्यायालयाच्या आवारात माननीय न्यायाधीश महोदयांच्या शुभहस्ते प्रतीकात्मक वृक्षारोपण करून न्यायालयातील विधीज्ञ, सेवक वृंद यांना बाळरोप दत्तक देण्यात आले. वर्षभर त्याचा सांभाळ करून त्या रोपाचे बारकोड द्वारे पालकत्वाचे नाव, वृक्षाची शास्त्रीय माहिती, उपयोगिता यासंबंधी माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासोबतच फाउंडेशन तर्फे परिसरातील शाळा, महाविद्यालय, बँका, पोस्ट ऑफिस व इतर आस्थापनांमध्ये सुद्धा वृक्ष दत्तक अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांच्या वतीने कौतुक करण्यात येत असून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढत आहे.

No comments