बेथल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो यावल :- शब्बीरखान सरवरखान (संपाद...
बेथल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो यावल :- शब्बीरखान सरवरखान
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
१५ ऑगस्ट स्वतंत्र दीना निमित्ताने बेतल इंग्लिश मीडियम स्कूल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहा मध्ये संपन्न झाला यावल शहरात भुसावळ रोड आसाम नगर येथे असलेल्या बेथल इंग्लिश मीडियम स्कूल येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
त्यात विद्यार्थ्यांकडून विविध वेशभूषा धारण केली होती त्यात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज , भारत माता ,सावित्री फुले अहिल्याबाई होळकर ,झाशीची राणी, महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल, नेहरू सुभाष चंद्र बोस, डॉक्टर अब्दुल कलाम लाल बहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा समावेश होता त्यात त्यांनी महापुरुषांविषयीची माहिती चिमुकल्यांनी सादरीकरण केले त्याचबरोबर सामूहिक देशभक्तीपर गीत या चिमुकल्यांनी सादर करत सर्वांचाच लक्ष वेधले याप्रसंगी ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यावल शहरातील नामांकित वकील ॲड .गोविंद बारी श्री छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील व प्रशांत महाजन यांना आमंत्रित केले होते कार्यक्रमाचे बेथल इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्य एडविना मेथीस मिस स्कूल प्रशासनाच्या वतीने सर्व विद्यार्थी पालकांना तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत कार्यक्रमाचे प्रस्थावित केले तर कार्यक्रमसाठी जास्टीना मेथीस लवली मॅडम चैताली मॅडम गायत्री देशमुख इतर सर्व शिक्षक कर्मचारी बंधू बघिनींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आनंद घेत पालकांचेही अनमोल असे सहकार्य या कार्यक्रमात लाभले त्या कार्यक्रमाचे आभार मिस जस्टीना मेथीस मॅडम यांनी केले.


No comments