धोकादायक खड्डामय रस्ते दुरूस्तीसाठी मनसेचे चेतन अढळकर .यांचा आंदोलनाचा इशारा शब्बीर खान :- यावल संपादक :- हेमकांत गायकवाड यावल शहराती...
धोकादायक खड्डामय रस्ते दुरूस्तीसाठी मनसेचे चेतन अढळकर .यांचा आंदोलनाचा इशारा
शब्बीर खान :- यावल
संपादक :- हेमकांत गायकवाड
यावल शहरातील यावल-भुसावळ, बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील रस्ता नेहमी वाहनांच्या वर्दळीचा असून गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्डयात पाऊसाचे पाणी साचल्याने हे रस्ते अपघातास आमंत्रण देणार आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे या रस्त्यावर वाहनधारकांचे अपघात होऊ लागले असून यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला .आहे
No comments