Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर- फैजपुर महामार्गावरील खड्ड्यातील मुरुम पावसात चिखल तर उन्हात धुराळा.

  रावेर- फैजपुर महामार्गावरील खड्ड्यातील मुरुम पावसात चिखल तर उन्हात धुराळा.             मातीसदृश मुरुम टाकत सार्वजनिक बांधकाम विभागाची दिख...

 रावेर- फैजपुर महामार्गावरील खड्ड्यातील मुरुम पावसात चिखल तर उन्हात धुराळा. 

           मातीसदृश मुरुम टाकत सार्वजनिक बांधकाम विभागाची दिखाव्याची धूळफेक


रस्त्यावरील खड्डे जैसे थे तैसेच        

रावेर प्रतिनिधी :- मोहसीन मुबारक तडवी.  

(संपादक :-हेमकांत गायकवाड )   

 रावेर तालुक्यातील अंकलेश्वर बुर्हानपूर महामार्गावरील फैजपुर, सावदा, विवरा, रावेर,ते चोरवड महाराष्ट्र मध्यप्रदेश चेकपोस्ट नाका पर्यंतच्या महामार्गावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्ड्यातून रस्ता आहे हेच वाहनधारकांना उमगेनासे झालेय रस्ता खड्डामय होवून जणू रस्त्याची चाळणच झालेली आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून वाहन चालकांना अंदाज समजत नसल्यामुळे सदर महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू आहे व अनेकांनी आपले जीव ही गमावलेली आहेत याच प्रकरणी रस्त्यावरील खड्डे व दैनंदिन होणारे अपघात याबद्दल सावदा परिसरातील पत्रकार बांधवांना सुध्दा उपोषण आंदोलने करावी लागली तदनंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग खळबळून जागे झाले होते याव्यतिरिक्त वाहन चालक नागरिकांनी ही मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या या अनुषंगाने सदर महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये कच्च्या मुरुम टाकत दुरुस्ती चा देखावा करण्यात तर आला मात्र शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी खर्ची घालून माती मिश्रित मृदा मुरुम या खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने टाकून खड्डे भरून बुजविण्याचे काम करण्याची तसदी प्रशासनाने घेतली पण ही खड्ड्यात टाकलेल्या माती सदृश्य मुरुमा ची पाऊस पडून रस्त्यावर चिखलाचे व डबक्यांचे साम्राज्य निर्माण झाले व नंतर पाऊस बंद झाल्यानंतर कोरडे झालेवर याच मुरुमाचा नुसताच धुराडा होवून खड्डे जैसे थे तैसेचि झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे आणि शासनाचा खर्ची पडलेला पैसा निधी काही चिखलातून वाहिला व उरलेल्या चा नुसताच धुराळा उडालेला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपरोक्त महामार्गावरील रस्त्यावरील खड्डे मुरुम न टाकता डांबरीकरण करुन बुजवावे अशी मागणी वाहनधारकांसह सुज्ञ नागरिकांतून चर्चेत आहे

No comments