Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जाहीर नोटीस

  नोटीस  रजि. पोष्ट ए.डी.द्वारा प्रति, १) श्रीमती कल्पना विजय पाटील उ.व.४८, धंदा-घरकाम रा.भाई कोतवाल रोड, चोपडा ता. चोपडा जि. जळगांव २) पंकज...

 नोटीस

 रजि. पोष्ट ए.डी.द्वारा

प्रति,

१) श्रीमती कल्पना विजय पाटील उ.व.४८, धंदा-घरकाम रा.भाई कोतवाल रोड, चोपडा ता. चोपडा जि. जळगांव

२) पंकज विजय पाटील उ.व. २७, धंदा-शिक्षण रा.भाई कोतवाल रोड, चोपडा ता. चोपडा जि. जळगांव

यांना राहुल विजय पाटील उ.व.३२, रा.नविन पोलीस लाईन ए-५, सातवा मजला रुम नं.७०२, एस. पी. ऑफिसच्या बाजुला जळगांव ता. जि. जळगांव यांचेकडुन ॲड. मिलींद पि. बडगुजर यांचेतर्फे नोटीस देणेत येते कि, ती येणेप्रमाणे,

१) वंशावळ

विजय गोरख पाटील

१) अरुणा विजय पाटील (पहिली पत्नी मयत) २) कल्पना विजय पाटील (२री पत्नी हयात)

पहिल्या पत्नी मुले

१) राहुल विजय पाटील २) स्वाती विजय पाटील ३) जयश्री विजय पाटील

 दुसऱ्या पत्नी पासुनचे मुले.

१) पंकज विजय पाटील

मिळकतीचे वर्णन :- तुकडी व जिल्हा परिषद जळगांव पोट तुकडी व तालुका पंचायत समिती चोपडा, तालुका चोपडा म्युन्सिपल हद्दीतील:-साधारण ३० वर्षांपर्वीचे लोडबेअरींगचे बांधीव घर मिळकत याचा सिटी सर्व्हे नंबर २१३३/ब एकुण क्षेत्र ६१.०० चौ.मी. यासी चतुः सिमा सिटी सर्व्हे नं.२१२१/१, पश्चिमेस रस्ता, उत्तरेस दक्षिणेस सि.स.नं. २१३२ येणेप्रमाणे घर मिळकत. पुर्वेस सि.स.नं.२१३४,

यातील नोटीस घेणार नं. १ ही नोटीस देणार यांची सावत्र आई असुन नोटीस घेणार नं.२ हा सावत्र भाऊ आहे. नोटीस घेणार नं. १ कल्पना विजय पाटील व विजय गोरख पाटील यांचे पती पत्नीचे नाते कायम आहे. विजय गोरख पाटील म्हणजे कल्पना विजय पाटील यांचे पती मयत झालेले असुन त्यांची पहिली पत्नी अरुणाबाई ही सुध्दा मयत झालेली आहे. विजय गोरख पाटील यांना पहिल्या पत्नीपासुन नोटीस देणार राहुल विजय पाटील, स्वाती विजय पाटील, जयश्री विजय पाटील, हे तिन अपत्ये झालेले असुन विजय गोरख पाटील यांना दुसऱ्या पत्नी कल्पना विजय पाटील हिच्यापासुन पंकज विजय पाटील हा झालेला आहे. म्हणजेच राहुल, स्वाती, जयश्री हे नोटीस घेणार नं.२ पंकज विजय पाटील यांचे सावत्र भावंडे आहेत.

२) अरुणा विजय पाटील व कल्पना विजय पाटील यांचे पती दिनांक २२/०९/२०१३ रोजी मयत झालले आहेत. तसेच नोटीस देणार यांची आई व विजय गोरख पाटील यांची पहिली पत्नी दि.०८ जुन १९९५ रोजी मयत झालेली आहे. सदर प्लॉट नंबर ६ हा श्रीमती कल्पना विजय पाटील हिने तिचे नावावर घेतलेली होती. परंतु सदरचा व्यवहार करतांना विजय गोरख पाटील व त्यांच्या दोन्ही पत्नींचे मुले एकत्र हिंदु कुटुंब पध्दतीत होते. सदरची घर मिळकत ही विजय गोरख पाटील यांच्या स्वः कष्टार्जीत कमाईतुन घेतलेली होती. विजय गोरख पाटील हे दि.२२/०९/२०१३ रोजी मयत झालेले आहेत. त्यावेळेस ते बरीचशी जंगम, स्थावर व रोख रक्कम सोडुन गेलेले होते. ४) असे असतांना दिनांक १३/०८/२०२१ रोजी नोटीस घेणार नं. १ हिने नोटीस घेणार नं.२ यांचे लाभात विना मोबदला बक्षीसपत्र करुन ठेवलेले आहे. सदरचे बक्षिसपत्र हे बेकायदेशीर असुन त्यात नोटीस देणार यांना व त्यांच्या भावंडांना वगळण्यात आलेले आहे. सदरचे बक्षिसपत्र हे पुर्णपणे सख्ख्या मुलाच्या स्वार्थापोटी केलेले आहे त्याला पुरावा म्हणुन नोटीस घेणार नं. १ ही तिच्या बक्षिसपत्रात पान नं.२ वरील, वरून ओळ नंबर १३ मध्ये लिहिते की, "तुम्ही माझा सख्खा मुलगा असुन माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास व भरोसा असल्या सदर प्रेमापोटी तुम्हांस माझी चिरंतर आठवण राहावी म्हणुन वरिल मिळकत मी तुम्हांस काहीएक मोबदला न घेता विना मोबदला बक्षिसपत्राने वरील मिळकत तुम्हांस दिलेली आहे." म्हणजेच स्वार्थापोटी दिलेली आहे हा पुरावा या ठिकाणी निर्माण होतो. सदरचे बक्षीसपत्र हे नोटीस देणार व त्यांच्या भावंडांवर अन्यायकारक असुन, सदरचे बक्षिसपत्र हे रद्द होण्यास पात्र आहे. सदरची मिळकत विकत घेतांना नोटीस घेणार नं. १ हिने तिचे पती विजय गोरख पाटील यांची राहिलेली शिल्लक रोख रक्कम व नोटीस देणार यांचा पगार, नोटीस देणार यांच्या पत्नीचा पगार असे एकुण रुपये १३,१०,०००/- सर्वांच्या कमाईतुन घेतलेली आहे. म्हणुन नोटीस घेणार नं. १ हिस नोटीस घेणार नं. २ याचे लाभात सदरचे बक्षिसपत्र करुन देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता व नाही.

५) नोटीस घेणार नं.१ कल्पना विजय पाटील हिने सुड बुध्दीने व चालाखीने सदरची रोख रक्कम गुंतवुन स्वतःच्या नावे सदरची घर मिळकत खरेदी केली व सदरची घर मिळकत ही तिच्या मृत्युनंतर सगळ्या वारसांमध्ये सम-समान वाटणी होणार होती परंतु सदरची मिळकत ही आपल्या सख्ख्या मुलालाच मिळावी ह्या स्वार्थी लाभासाठी नोटीस घेणार नं. १ ही जिवंत असतांनाच तिच्या सख्ख्या मुलाच्या नावावर म्हणजेच नोटीस घेणार नं. २ पंकज विजय पाटील याच्या नावावर करुन घेतली. वास्तविक जिवंत असतांना सदर मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा कोणताही अधिकार नव्हता. सदरची मिळकत विकत घेतांना नोटीस देणार यांनी रोख रक्कम रूपये २,४०,०००/- हा सुमारे ३ वर्षांचा पगार तसेच नोटीस देणार यांची पत्नी सुवर्णा राहुल पाटील यांच्याकडुन रोख रक्कम रूपये १,००,०००/ तसेच नोटीस घेणार यांचे सासरे गोरख भिला पाटील यांचे नावे असलेल्या प्लॉट एकुण त्याची आलेली रक्कम रूपये ७,००,०००/- असे एकुण रूपये १०,४०,०००/- व रूपये २,७०,०००/- (प्लॉट विकुन आलेले) अशी एकुण रक्कम रूपये १३,१०,०००/- नोटीस देणार राहुल विजय पाटील यांच्या वडिलांची शिल्लक नोटीस घेणार नं. १ हिच्या जवळ होती त्या रक्कमेचा नोटीस घेणार नं. १ हिने सुडबुध्दीने वापर करुन व स्वार्थापोटी वरील घर मिळकत खरेदी केली व स्वतःच्या सख्ख्या मुलाच्या नावावर सदरची घर मिळकत या बक्षीसपत्राने करुन दिलेली आहे. सदरचे बक्षीसपत्र हे बेकायदेशीर असुन ते रद्दबातल होणेस पात्र आहे.

६) तरी आपणास या नोटीसीने कळविण्यात येते की, नोटीस घेणार नं. १ हिने नोटीस घेणार नं.२ हिच्या लाभात करून दिलेले बक्षीसपत्र नं. ३६११/२०२१ चोपडा रद्द करुन तसा दस्त १५ दिवसांच्या आत आणुन द्यावा.

तुम्ही तसे करण्यास चुकल्यास आम्ही योग्यत्या कोर्टात दिवाणी, फौजदारी, महसुली कारवाही करु त्याच्या होणाऱ्या खर्चास व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. सदर नोटीसीचा खर्च रक्कम रूपये २०,०००/- देणेस आपण जबाबदार राहाल येणेप्रमाणे नोटीस दिली असे.

जळगांव                                      दिनांक/.                                                      ०८/२०२४

असे

नोटीस देणार

सदर नोटीस आमचे पक्षकाराचे सांगणेवरुन, माहितीवरुन व अधिकारावरुन दिली असे.

नोटीस देणार तर्फे ॲडव्होकेट

ॲड. मिलींद पी. बडगुजर, जळगांव

No comments