चोपडा आम आदमी पार्टीच्या वतीने चोपड्याचे तहसिलदार यांना निवेदन सादर चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) दुर्देवी घटनेचा जाहीर निष...
चोपडा आम आदमी पार्टीच्या वतीने चोपड्याचे तहसिलदार यांना निवेदन सादर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
दुर्देवी घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक कोसळले या घटनेचा जाहीर निषेध दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता.
काल दिनांक २६/०८/२०२४ रोजी सदर पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा बसवण्यापूर्वी शिवप्रेमींनी आवाज उठवून पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास धरून नसल्याचे कळवले होते. परंतु सदर सूचनांकडे दुर्लक्ष करून सदर शिवस्मारकाचे घाई घाईने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदरच्या शिवस्मारकासाठी महाराष्ट्रातील जनतेचे अडीच कोटी रुपये खर्चुन जयदीप आपटे या अल्पअनुभवी कारागिराला काम दिले गेले. विद्यमान सरकारने फक्त प्रसिद्धीसाठी देशातील कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना आज दुखावल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवितो तसेच सदर दुर्दैवी घटनेला जबाबदार भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व मंत्र्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली आहे
No comments