कोलकाता प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या - जगदिश सु.ल.मानवतकर . प्रतिनिधी चोपडा (संपादक :- हेमकांत गायकवाड) कोलकाता येथील आरजी...
कोलकाता प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या - जगदिश सु.ल.मानवतकर .
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
कोलकाता येथील आरजी.कर हॉस्पिटल मधील ट्रेनी महिला डॉक्टर यांच्यावर दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या निघृण हत्या आणि बलात्कार घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय आणि त्याचे साथीदार यांना तात्काळ फाशी द्यावी या , आरजी.कर हॉस्पिटलची मान्यता रद्द , त्या हॉस्पिटलचे प्रमुख अधिकारी डॉक्टर संदीप घोष यांना तात्काळ निलंबित करावे , या प्रकरणाची उच्च सीबीआय चौकशी व्हावी,पीडितीच्या कुटुंबाला न्याय द्यावा .
या इतर मागन्यासाठी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर असे नमूद करण्यात आले आहे की, पीडित महिला ही डॉक्टर असून ती कोलकाता येथील आर जी.कर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना ९ ऑगस्ट २०२४ त्या महिलेसोबत माणुसकीला काळीमा फासेल असे कृत्य घडले . यावेळी या घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय याने या महिलेला जबर मारहाण करून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला यामध्येही ही महिला डॉक्टर जागीच मृत्युमुखी पडली असून सदरच्या प्रकरणात उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तरी अद्यापही मुख्य सूत्रधार कोण आहे? हे माहिती नाही. तरी या प्रकरणा मध्ये माननीय नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फासावर लटकवावे या करिता हे निवेदन देण्यात आले . यावेळी निवेदन देतेवेळी ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे संस्थापक अध्यक्ष जगदीश सु. ल.मानवतकर सर ,सरकार इंगोले , अरुण भाऊ शेळके ,AIBTS चे विदर्भ संपर्क प्रमुख संविधान भाऊ ढोले , AIBTS वाशीम जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन बांगर ,विदर्भ महासचिव रवी भाऊ ठोके ,राहुल बलखंडे समाजसेवक वाशीम , भ्याग्यश्री ताई , आशिष कोकरे , सचिन राऊत, बबनराव वाळके,गजेंद्र राऊत यांची उपस्थिती होती.


No comments