adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंबादेवी धरणातील डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  निंबादेवी धरणातील डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू शब्बीर खान यावल (प्रतिनिधी)  (संपादक :- हेमकांत गायकवाड) जिल्ह्यातील प्...

 निंबादेवी धरणातील डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


शब्बीर खान यावल (प्रतिनिधी) 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले निंबादेवी धरण येथे मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.१९ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.वेदांत सुवर्णसिंग पाटील वय-२० रा.निमगाव ता.यावल असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आई-वडील आणि बहीण सोबत वास्तव्याला होता.सध्या तो पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता.काल रक्षाबंधनच्या निमित्ताने सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी निमगावपासून जवळ असलेल्या निंबादेवी धरण येथे फिरण्यासाठी गेला होता


त्यावेळी मित्रांसोबत जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला त्यानंतर तो वर आलाच नाही त्यामुळे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले व तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल तायडे यांनी त्याला मयत घोषित केले.दरम्यान घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडील यांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत यावल पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे

No comments