आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा १४ ऑगस्ट रोजी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल उपविभागीय अ...
आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा १४ ऑगस्ट रोजी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा १४ ऑगस्ट रोजी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की
मलकापूर :- उपविभागातील मलकापूर,नांदुरा,मोताळा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे या संदर्भात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना मागील महिन्यात १८ जून २०२४ रोजी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते,त्या निवेदन मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे निकाल, महाराष्ट्र शासनाचे पत्र शासकीय गॅजेट्स, मानव वंश शास्त्रज्ञांचे ग्रंथ,यांचे संदर्भासहित निवेदन देण्यात आले होते उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना १८ जुन २०२४ रोजी दिलेले निवेदन मधील उच्च न्यायालय निर्णय व इतर पुराव्यांच्या आधार घेऊन आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अर्जदारास अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा येणाऱ्या १४ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन
करण्यात येणार या संदर्भात आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळीगणेश इंगळे, गजानन धाडे गीताताई कठोरकर ,विलास कांडेलकर,शुभम घुले,विठ्ठल तायडे,वासुदेव सोनोने,प्रविण जाधव, विनोद धामोडे,श्रीकृष्ण धाडे,अनंता सुरळकर मनोहर भोलणकर,संजय खवले,सागर खवले,विर सिरसाठ,विश्वास वाघ,संदीप धाडे,उमेश धाडे, भगवान झाल्टे उपस्थित होते.
No comments