क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपळादेवी शाळेला मिळाले प्रथम पारितोषिक ( धुळे :- विशेष प्रतिनिधी) (संपादक :- हेमकांत गायकवाड) ...
क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपळादेवी शाळेला मिळाले प्रथम पारितोषिक
(धुळे :- विशेष प्रतिनिधी)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व्दारा, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे २०२३-२४ या वर्षात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मुले व मुलींचे सर्वाधिक संघ सहभागी होवून विशेष कामगिरीनुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकविल्याबदद्दल गुणांक्रमानुसार, आणि राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना संधी देणारे व घडविणारी शाळा म्हणून शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री. पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला १९ व १४ वर्षे वयोगटातून अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांकांचे क्रीडा प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्तीचा १२५३०९ रुपयांचा धनादेश क्रीडादिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्या शुभहस्ते स्विकारतांना विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. पाटील, क्रीडा शिक्षक आर. बी. शिंदे, नेटबॉल प्रशिक्षक योगेश वाघ तसेंच, संपूर्ण धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यातील एकूण =५८, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंना स्कॉलरशिप प्रत्येकी रुपये -४०००/-रोख देण्यात आलें, त्यातही आमच्या श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे जिल्हातील एकूण ५८ पैकी सुमारे १९, खेळाडूंना प्रत्येकाला,४००० रुपये क्रीडाशिष्यवृत्ती,१९×४०००=७६०००, रुपये आपल्या पिंपळादेवी विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राप्त झालेत, यांचे संपूर्ण श्रेय आपल्या शाळेतील क्रीडाविभाग, क्रीडाशिक्षक, आणि विशेषतः आपलेच माजी खेळाडूंना म्हणजे राष्ट्रीय खेळाडू, श्री योगेश आणि श्री अविनाश वाघ यांच्या प्रयत्नांना आहें, शिवाय क्रिडांगणा तील खेळाडूंना व खेळाप्रति त्यांच्या मेहनतीला, प्रामाणिकपणे सरावालाही जाते, नुकतेच आपल्या शाळेतील दोन राष्ट्रीय खेळाडूंना CRPF ची नोकरीं धुळे व नंदुरबार येथें लागली आहें. त्यासाठी श्री पिंपळादेवी संस्था अध्यक्ष मा. श्री विनायक बापूजी शिंदे, सर्वं मा. संचालक मंडळ सदस्य, प्राचार्य बापूसाहेब श्री आर. व्ही पाटील सर तसेंच उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्वं आजी -माजी क्रीडाप्रेमी खेळाडूं यांच्याकडून आजच्या सत्कार्मुर्ती संपूर्ण १९, खेळाडूंना, प्राचार्य श्री आर.व्ही.पाटील सरांना , क्रीडाप्रमुख -श्री आर. बी. शिंदे सर आणि श्री वाय.डब्लू.वाघ सरांना, खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
No comments