श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न.... महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन मुक्ताईन...
श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न....
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन
मुक्ताईनगर सतीश गायकवाड
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले होते. मा.आमदार एकनाथराव खडसे
यांच्या वाढदिवसानिमित्त सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.ॲड. सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर (चेअरमन,मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असून समाजासाठी व देशासाठी रक्तदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मतप्रतिपादन केले. या शिबिराप्रसंगी मा.श्री.नारायणदादा चौधरी (उपाध्यक्ष मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर) मा. डॉ. सी. एस. चौधरी(सचिव, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर) मा. श्री. चंद्रशेखरजी बढे, मा. श्री. पुरुषोत्तमभाऊ महाजन, मा. श्री.रामचंद्र चौधरी मा. श्री.आर.पी. बर्हाटे,मा. श्री.रमेश खाचणे,मा. श्री. महेश पाटील (संचालक, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर) यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराप्रसंगी रेड प्लस सोसायटी, जळगाव येथील मा. श्री.अमोल शेलार,डॉ.वीरेंद्र बिर्हाडे, श्री.दीपक पाटील,श्री. रितेश जोशी, शाहीद शेख, दिनेश भोळे यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी डॉ. दीपक बावस्कर (रासेयो, कार्यक्रमाधिकारी)यांनी शिबिराची उपयोगिता व महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले. सूत्रसंचालन डॉ. ताहिरा मीर (रासेयो, महिला कार्यक्रमाधिकारी) यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. के.एन. गायकवाड (रासेयो, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी. पाटील, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
No comments