भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती निमित्त चोपडा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन चोपडा :- प्रतिनिधी...
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती निमित्त चोपडा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन
चोपडा :- प्रतिनिधी
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २० ऑगस्ट २०२४ वार मंगळवार रोजी दुपारी ठीक ०३:०० वाजता चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ग.स.सोसायटीचे माजी संचालक श्री रमेश एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,यावेळी स्वर्गीय राजीवजींनी तरुणांसाठी केलेले कार्य,१८ वर्ष वयात मतदानाचे अधिकार, तंत्रज्ञानातील क्रांती व इतर उल्लेखनीय कामगिरीचा ओहापोह कार्यकर्त्यांनी केला यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे, चोपडा शेतकरी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोपाल नवल धनगर,माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,आरिफ शेख सिद्दिकी,डॉ.अशोकराव कदम,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद शेख,किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे,हेमराज युवराज पाटील,भुरा जहाँगीरदार,हकीम दादा शेख,राजकुमार सोनवणे,समद अली सैय्यद,सलीम खान आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments