हातेड खुर्द येथील विकास सोसायटीचे चेअरमन श्री शिवाजी बाविस्कर यांचे हस्ते ध्वजारोहण हातेड ता.चोपडा :- प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवा...
हातेड खुर्द येथील विकास सोसायटीचे चेअरमन श्री शिवाजी बाविस्कर यांचे हस्ते ध्वजारोहण
हातेड ता.चोपडा :- प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
१५, ऑगस्ट२०२४ रोजी गुरुवारी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हातेड खुर्द विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड, हातेड खुर्द, तालुका चोपडा जिल्हा जळगांव, येथें स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, चेअरमन श्री शिवाजी देविदास बाविस्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले
तर व्हाईस चेअरमन श्री अशोक पौलाद शिरसाठ, तसेंच संपूर्ण मान्यवर संचालक मंडळ सदस्य, गावातील मान्यवर ग्रामस्थ,मा. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पिक संरक्षक सोसायटी व दूध डेअरी चे चेअरमन व मा. संचालक मंडळ सदस्य,बचत गटाच्या महिला भगिनी, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, विकास सोसायटी चे सेक्रेटरी, क्लार्क मंडळी,याशिवाय
हातेड येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मान्यवर मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनीं, सदर ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते तर सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री संजय पुंडलिक बाविस्कर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर चेअरमन श्री शिवाजी देविदास बाविस्कर यांनी स्वातंत्र्य दिनाच महत्व विषद करून, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या संपूर्ण मान्यवरांचे आभार मानले,
शिवाय विकास चेअरमन श्री शिवाजी बाविस्कर यांनी त्यांचे स्वर्गीय वडील भाऊसाहेब कै. देविदास पांडुरंग बाविस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल हातेड येथिल गरजू, होतकरू ५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व्यक्तिशः स्वखर्चाने सप्रेम भेट दिलेत, यां प्रसंगी पर्यवेक्षक श्री पंजाबराव बाविस्कर सरांनी ही विचार व्यक्त केलेत, तर हातेड खुर्द विकास सोसायटीच्या प्रांगणात मोठया उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. तद्नंतर कार्यक्रमास उपस्थित, संपूर्ण मान्यवरांचे आभार मानून सर्वांना चहापान झाल्यावर,स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला




No comments