फैजपूरात शासनाच्या विरोधात महाविकास आघाडी चा रस्ता रोको आंदोलन येथील छत्री चौकात सकाळी दहा तीस वाजता महाराष्ट्र शासनाच्या विरोधात महाविकास...
फैजपूरात शासनाच्या विरोधात महाविकास आघाडी चा रस्ता रोको आंदोलन
येथील छत्री चौकात सकाळी दहा तीस वाजता महाराष्ट्र शासनाच्या विरोधात महाविकास आघाडी च्या वतीने कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून रस्ता रोको आंदोलन केले.
इदू पिंजारी, फैजपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या तर्फे आज दि. २४/०८/२०२४ रोजी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचार व लहान मुलींची असुरक्षितता लक्षात घेता फैजपूर येथे बंद पुकारण्यात आले होते. तर छत्री चौकात सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र शासनाच्या विरोधात महाविकास आघाडी च्या वतीने कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
सर्व सामान्य नागरिक तसेच महाविकास आघाडी च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महायुती शासनाने आरोपीवर कठोर कार्यवाही न केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी भावी आमदार धनंजय चौधरी, मा. उपनगराध्यक्ष केतन किरंगे, काँग्रेस शहर अध्यक्ष शे.रियाज, नगरसेवक कलीम मणियार, डॉ. गणेश चौधरी, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, गणेश गुरव सर, सामाजिक कार्यकर्ते अशोक भालेराव, शिवसेनेचे अप्पा चौधरी,नगरसेवक रशीद तडवी, वसीम तडवी, योगेश भावसार, शिवसेनेचे शहर अध्यक्ष भास्कर सोनवणे,आरिफ शेख, साजिद मेकनिकल, संदीप माळी, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


No comments