प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावात लखपती दिदी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रतिनिधी जळगाव (संपादक :- हेमकांत गायकवाड) ज...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावात लखपती दिदी कार्यक्रमाचा शुभारंभ
प्रतिनिधी जळगाव
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जळगावात लखपती दीदी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी महिला वर्गाच्या उपस्थितीचं कौतुक केलं. अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात बोलताना म्हटलं की, विकासाचा रथ आज जळगाव मध्ये आला आहे. सलग तीन वेळा पंतप्रधान झालेल्या नरेंद्रजी मोदींच मी १२ करोड जनतेच्यावतीने अभिनंदन करतो. माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा महिलांची इतकी गर्दी बघतो आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताला इतकी गर्दी पहिल्यांदा झालीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपण सगळे मिळून ५ लाख महाराष्ट्रातील महिलांना लखपती करूयात. इतका पाऊस असताना कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांचं आभार मानतो. या महाराष्ट्राने महिलांना सबल केले. आपण देखील महिलांना सक्षम केले. ज्या लखपती झाल्या त्यांनी आता इतरांना लखपती करावं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिलांनी गर्दीचे रेकॉर्ड तोडल्याबद्दल आभार मानले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना संधी दिली तर ते बदल कस घडवता येतो हे आपण पाहिलं. महिला अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आले तरी त्या काय करू शकता हे आपण बघत आहोत. विकसित भारतासाठी महिलांचं योगदान महत्वाचं आहे. मोदींच्या नेतृत्वात अनेक उपक्रम राबवत असताना. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात देखील आपण अनेक योजना राबवत आहोत. बचत गट २ कोटींवर नेऊ. महिलांना दिलेले कर्ज बुडत नाही म्हणून बँक देखील त्यांना पैसे द्यायला तयार आहे. जळगाव मधील दुःखद घटना घडली. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नार पार योजना आज टेंडर काढण्याची आज घोषणा करतो. आम्ही शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार आहोत असंही फडणवीस यांनी म्हटलं
पंतप्रधान मोदींनी सांगितला पोलंड मधील किस्सा
महाराष्ट्रातील संस्कृतीचा डंका जगभरात वाजला आहे. जगभरात महाराष्ट्रीय लोकांचा चांगला सन्मान केला जात आहे. त्यासंदर्भातील उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, मी युरोपमधून पोलंडला गेलो. त्या ठिकाणी मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. महाराष्ट्राची संस्कृती दिसली. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूपच सन्मान करतात. पोलंडच्या राजधानीत त्यांनी कोल्हापूर मेमोरियल उभारले आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन मला सर्वत्र होते. महाराष्ट्राचे हे संस्कार भारतातच नाही तर जगात गेले आहेत
लाखो जण बचत गटांसोबत
लखपती दिदीचं महासंमेलन होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटींहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांतून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळेल. सर्वांना माझ्या शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
मोदींनी नेपाळमधील मृतांना वाहिली श्रद्धांजली
नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांना नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, नेपाळ दुर्घटनेत आपण जळगावमधील अनेक सहकाऱ्यांना गमावले आहे. मी या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही दुर्घटना झाल्यावर भारत सरकारने नेपाळ सरकारशी संपर्क साधला. आपण रक्षा खडसे यांना लगेच नेपाळला पाठवलं. जे लोक राहिले नाहीत, त्यांच्या पार्थिवांना आपण वायूसेनेच्या विमानाने आणलं. जे जखमी आहेत, त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत.
एक कोटी दीदी लखपती झाल्या आहेत. आज ११ लाख दीदींना लखपतीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. लवकरच एकूण ३ कोटी दिदी लखपती बनणार आहे.
No comments