adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ग.स.शाखेतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  चोपडा ग.स.शाखेतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ध्वजारोहण लासुर जि.प.केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले...

 चोपडा ग.स.शाखेतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ध्वजारोहण लासुर जि.प.केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले.


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-चोपडा 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

ज.जि.स.नो.स.प.लि.जळगाव उर्फ ग.स.संस्थेच्या चोपडा शाखेतर्फे भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग.स.कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष योगेश सनेर व स्थानिक संचालक मंगेश भोईटे यांची संचालक पदावर निवड झाल्यापासून संस्थेच्या भरभराटीत योगदान देणाऱ्या सभासदांच्याच हस्ते धजारोहाणाची आदर्श परंपरा निर्माण केलेली असून विविध योजनांचे धनादेश सूध्दा सभासदांच्याच हस्ते वितरीत करण्यात येतात. त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असते. याप्रसंगी ध्वजारोहण लासुर जि.प.केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संचालक योगेश सनेर यांनी केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ सभासद व सहकार गटाचे नेते आर. एच. बाविस्कर यांचेहस्ते नवनियुक्त केंद्रप्रमुख वैशाली पाटील, दिनेश चौधरी, ग्रेडेड मुख्याध्यापक गुरुदत्त निंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे जेष्ठ सभासद लक्ष्मण सोनवणे, रावसाहेब कंखरे, एन.बी.बडगुजरसर, आरोग्य विस्तार अधिकारी सुशील सोनवणे, प्रमोद देवरे यांचेसह सर्व कर्मचारी वृंद हजर होते.

No comments