Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड मुक्ताईनगर  सतीश...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड



मुक्ताईनगर  सतीश गायकवाड 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

दिनांक 23 ऑगस्ट 2024, ला तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन श्री. एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल येथे वयोगट 14 वर्षातील मुले व मुली आणि सतरा वर्षा आतील मुले व मुली या वयोगटांच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले होते; सदरहू तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता या बुद्धिबळ स्पर्धेत स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी घवघवीत असे यश संपादित केलेले आहे त्यांच्या यशाची पावती म्हणून सदरहू 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थी जयेश स्वप्नील खोले, विद्यार्थिनी श्रृती दत्तात्रय फेगडे, सृष्टी सुधाकर मोरे तसेच 17वर्ष वयोगटातील विद्यार्थी अनिकेत दादूलाल भोई व विद्यार्थिनी अनुष्का विनोद काटे या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरीता निवड झालेली आहे त्याबद्दल संस्थेचे सचिव श्रीमती रक्षाताई खडसे

 केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार,

 तथा संस्थेचे अध्यक्ष व इतर सदस्य यांच्याकडून विजेत्या विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे तथा त्यांच्या पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

या सर्व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर आणि क्रीडा शिक्षक गणेश बोदडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतर्फे या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments