यावल तहसील कार्यालयासमोर शिंदे गटाचे आंदोलन; प्रशासनाला दिले निवेदन शब्बीर खान यावल (संपादक हेमकांत गायकवाड) तहसील कार्यालयातील दलाल...
यावल तहसील कार्यालयासमोर शिंदे गटाचे आंदोलन; प्रशासनाला दिले निवेदन
शब्बीर खान यावल
(संपादक हेमकांत गायकवाड)
तहसील कार्यालयातील दलालांच्या वाढत्या गोंधळामुळे सामन्य नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने शिंदे गटाच्या वतीने यावल तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबत तालुका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपसंघटक नितिन सोनार, शहरप्रमुख पंकज बारी, शहर उपप्रमुख सागर सपकाळे, ईस्माईल तडवी, राजु बारी, कैलास भोई, किशोर तेली यांच्यासह आदी उपस्थित होते.
No comments