खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव हातेड खुर्द येथे साजरा श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाईचा हा उत्सव ख...
खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव हातेड खुर्द येथे साजरा
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाईचा हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो.
![]() |
मातेची केलेली स्थापना |
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव हातेड खुर्द येथे साजरा करण्यात आला यावेळी प्रमोद बोरसे यांनी नवसपुर्ती साठी त्यांनी कानबाई मातेची स्थापना केली आहे तर कानबाई माता ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते. खानदेशातील ब्राह्मण, वाणी, मराठा, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार आदी समाजबांधव श्रावणातील शुक्ल पक्षात कानबाईची पूजा करतात.
![]() |
प्रमोद बोरसे यांचेकडे मातेची स्थापना |
या देवतेची खानदेशात कोठेही यात्रा भरत नाही. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने 'नवसपूर्ती' करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात. खान्देशाच कुलदैवत म्हणून कानबाई मातेचा उत्सवाला सुरुवात ही नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या रविवारी साजरा केला जातो विशेष म्हणजे हा सण फक्त खांन्देशातच साजरा केला जातो या उत्सवाला घरापासून बाहेरगावी नोकरीसाठी गेले नातलग भाऊबंद एकत्र येऊन कानबाई मातेची सेवा करतात.
![]() |
मातेची आरती करतांना |
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाईचा हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. ह्याला रोट उत्सव म्हणून ओळख आहे. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु, चण्याची दाळ घेतले जाते.
![]() |
सहकुटुंब सहपरिवार पुजा करतांना |
चक्कीवरून दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वयंपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळीचा स्वयंपाक असतो.कानबाई मातेच्या स्थापनेसाठी नवनवीन साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच! एकवेळ लगीनसराई, दिवाळीसारखे सण टाळतील, पण कानबाई मातेच्या या उत्सवाला पाठ कोणीच फिरविणार नाही परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक दिवसांपासून भेटलेले मित्र एकमेकांना पुन्हा भेटत असतात. यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.कानबाईची स्थापना झाल्यानंतर रात्री गावातील लोकांसह परिसरातील आबालवृद्ध एकत्रित येतात. यावेळी रात्रभर स्वरचित गाणी म्हणत, फुगड्या खेळत, थट्टा- मस्करी करीत जागरण केले जात असते. दुसऱ्या दिवशी गावातील लोक अर्धा दिवस कामकाज बंद ठेवून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.
नेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रा.ली.तर्फेही करण्यात आली पुजा !
नेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रा.ली.चे संस्थापक वंदनाताई सोनवणे व व्यवस्थापकीय संपादक शामसुंदर सोनवणे यांनी ही केली कानबाई मातेची सपत्नीक पुजा
![]() |
व्यवस्थापकीय संपादक व संस्थापक यांनी केली पुजा |
No comments