adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विभागीय आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)यांनी वनक्षेत्रपाल कैलास अहिरे (सामाजिक वनीकरण यावल)यांच्या विरोधात कार्यवाहीचे दिले आदेश

विभागीय आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)यांनी वनक्षेत्रपाल कैलास अहिरे (सामाजिक वनीकरण यावल) यांच्या विरोधात  हेमकांत गायकवाड यांनी दिलेल्या...

विभागीय आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)यांनी वनक्षेत्रपाल कैलास अहिरे (सामाजिक वनीकरण यावल)यांच्या विरोधात 

हेमकांत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात कार्यवाहीचे दिले आदेश

तक्रारदार हेमकांत गायकवाड 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा 

(संपादक :- हेमकांत गायकवाड )

 जन माहिती अधिकारी तथा वनक्षेत्रपाल  सामाजिक वनीकरण, यावल यांना मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी माहिती देण्याचे आदेश दिले होते परंतु या दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून ठेंगा व बगल दाखवण्यात आली असल्याची माहिती समोर आली असून त्यांचेवर अद्याप पर्यंत माहिती न दिल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची मागणी श्री. हेमकांत बळीराम गायकवाड (पत्रकार) भ्रष्टाचार विरोधी जन अक्रोश महाराष्ट्र राज्य संघटना (जिल्हाध्यक्ष), ता. चोपडा, जि. जळगांव यांनी दि. २४/०६/२०२४ रोजी ईमेल द्वारे केली होती. तरी सदरचा ई-मेल हा  विभागाशी संबंधित असल्याने ई-मेल मधील नमूद मुदयांचे अवलोकन करुन त्यानुसार नियमोचित कार्यवाही करण्याचे आदेश नुकतेच प्राप्त झाले असून  केलेल्या कार्यवाही बाबत संबंधित स्तरावरुन कारवाई करून संबंधितांना कळविण्यात यावे  असा सोबत संदर्भिय ई-मेल पाठविण्यात आला आहे यामुळे विभागीय आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)यांनी वनक्षेत्रपाल कैलास अहिरे (सामाजिक वनीकरण यावल)यांच्या विरोधात हेमकांत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात कार्यवाहीचे दिले आदेश

No comments