Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी डी‌.एम‌.नेतकर हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त

  चोपडा तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी डी‌.एम‌.नेतकर हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त नेशन महाराष्ट्र न्यूज...

 चोपडा तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी डी‌.एम‌.नेतकर हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-लासुर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

लासूर ता‌.चोपडा(वार्ताहर) चोपडा तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी डी‌.एम‌.नेतकर हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त झाले असून या निमित्ताने चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चोपड्याचे नायब तहसीलदार अशोक सोनवणे(सं.गां‌.यो.) सचिन बाबडे‌( निवासी नायब तहसीलदार )तसेच आर‌.बी‌.माळी (मंडळ अधिकारी हातेड), योगेश नन्नवरे (जिल्हाध्यक्ष महसूल संघटना जळगाव), पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन हे होते.   यावेळी डी‌.एम‌.नेतकर‌ यांच्या संघटनेच्या वतीने पदाधिकारींचा हस्ते सत्कार करण्यात आला तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी ही वैयक्तिक सत्कार केला यावेळी चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नेतकर यांच्या सेवापुर्ती सोहळा चे आयोजन म्हणजे त्यांनी केलेल्या चांगल्या प्रकारे सेवेची पावती आहे यावेळी गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे, अशोक बाविस्कर,पी‌.एम‌.पाटील, महेश महाजन व सत्कारार्थि डी‌.एम‌.नेतकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए‌.डी‌.कोळी‌ यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.या कार्यक्रमाला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष मधूकर राजपूत, खजिनदार दिलीप पालीवाल, तसेच पदाधिकारी कांतीलाल चौधरी, रूपेश कोष्टी, रमेश जी शिंदे,ए‌.टी‌.जैन, प्रविण पाटील,देवा महाजन,प्रकाश पाटील,नरेंद्र पाटील,एन‌.डी‌.जैन, राजू तडवी, रविंद्र बाविस्कर,अशोक चौधरी, प्रभाकर महाजन ,महिला बचत गटाच्या सौ ‌.मिनाताई‌ कोळी तसेच चोपडा तालुक्यातील महसूल कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदार, पत्रकार,व प्रतिष्ठित नागरिक सेवापुर्ती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments