Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मानव सेवा विद्यालयात सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन।

  मानव सेवा विद्यालयात सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन ।     जळगाव येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांन...

 मानव सेवा विद्यालयात सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन।    

जळगाव येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा  

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

          जळगाव येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर विद्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील दीक्षांत वानखेडे आणि जानवी सपकाळे यांचे स्वागत मुख्याध्यापिका माया अंबटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले‌.        आजकाल लहान असो की ,मोठे व्यक्ती मोबाईल शिवाय राहू शकत नाही तसेच माणसाचे भरपूर काम हे मोबाईलवर होत असते .ऑनलाइन शॉपिंग असो, ऑनलाइन जेवण्याची ऑर्डर असो, की काही वस्तू घेतले तर तिथे सुद्धा ऑनलाईन पेमेंट करावे लागते. हे सर्व काम करत असताना आपण सर्वांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे .याविषयी मार्गदर्शन करताना दीक्षां वानखेडे बोलत होते तसेच काही महत्त्वाच्या माहिती सुद्धा त्यांनी विद्यार्थ्याना सांगितलेले आहे.


    आपल्या मोबाईल साठी मजबूत पासवर्ड वापरा .आपले इंस्टाग्राम खाते खाजगी ठेवा. कोणत्याही ओटीपी शेअर करू नये .क्रेडिट कार्ड मध्ये पासबुक फसवणूक होऊ शकते .ऑनलाईन गेम फसवणूक होऊ शकते .विद्यार्थ्यांनी जास्त मोबाईल वापरू नये. ऑनलाइन शॉपिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे .सायबर बुलिंग अशा अनेक विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व चर्चा करण्यात आली.     


                              या कार्यक्रमासंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मनोज बावस्कर सुनिल दाभाडे ,योगिता घोलाणे इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments