adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनवर्दे बुधगाव येथील पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालयात सोलर बॅटरी सह इ.साहित्य चोरीस

अनवर्दे बुधगाव येथील पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालयात सोलर बॅटरी सह इ. साहित्य चोरीस       नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा (...

अनवर्दे बुधगाव येथील पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालयात सोलर बॅटरी सह इ.साहित्य चोरीस   



  

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

अनवर्दे बुधगाव येथील पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालयात सोलर बॅटरी सह इ.साहित्य चोरीस  याबाबत अधिक माहिती अशी की 

पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालय अनवर्दे बुधगाव ही शाळा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत असुन सकाळी १०:०० पासुन ते सांयकाळी ५:०० वाजे पर्यत असते शाळेत संगणक, टेबल खुर्ची, सोलर बॅटरी, फॅन अश्या प्रकारचे विविध साहित्य असुन ते शिक्षक दालनात ठेवलेले असुन  शाळेचे दैनंदिन काम दिनांक ०६/०८/२०२४ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० वाजे पर्यत शाळेचे दैनंदिन काम आपटुन शिक्षक व कर्मचारी वर्ग घरी गेले होते दि. ०७/०८/२०२४ रोजी सकाळी ०६:३० वाजेचे सुमारास शाळेचे मुख्याध्यापक घरी असतांना त्यांना शाळेतील शिपाई प्रकाश दादागीर गोसावी यांनी फोन करुन कळविले की, मला गावातील शेतकरी नवल मुरलीधर वाघ यांनी सांगितले की, शाळेचे आवारात केबल वायर पडलेली आहे सदरील माहिती मिळताच मुख्याध्यापक  शाळेत  गेले असता त्यांना शाळेचे आवारात केबल वायर तुटुन पडलेली दिसली व ट्युबेलचे पाईप तोडुन नुकसान केलेले दिसले त्यामुळे शाळेतील खोल्या चेक केल्या असता शाळेतील शिक्षक दालनातील सोलर बैटरी, छोटा फॅन, ट्युबेल स्टाटर, परिसरातील ट्युबेल मधील ०३ एच पी मोटर असे चोरी झाल्याचे असे शिपाई प्रकाश दादागीर गोसावी यांनी सांगितल्याने मुख्याध्यापक बळवंत सोनवणे ह्यांनी सकाळी ०७:२० वाजता शाळेत जावुन खात्री केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पंडितराव त्र्यंबकराव  साळुंखे विद्यालय अनवर्दे बुधगाव येथील शिक्षक दालनाचे कुलूप व कोंडा तोडुन आत प्रवेश करून दालना मधील सोलर बॅटरीचे ०२ नग, ०१ छोटा फॅन, ट्युबेल स्टाटर, परिसरातील ट्युबेल मधील ०३ एच पी मोटर, ट्युबेल वायर असे चोरून नेले आहे त्यांचे वर्णन खालील प्रमाणे.

०१)१५०००/-रुपये किमतीच्या ०२ एक्साईट कंपनीच्या २०० ॲम्पीअरच्या सोलर बॅटरी जु.वा.कि.अ.

०२)१०००/- रुपये किंमतीचे ट्युबेलचे स्टाटर जु.वा.कि.अ. ०३) ३००/- रुपये किंमतीचा वॉल फॅन जु.वा.कि.अ.

०४)१००००/-रुपये किंमतीची ०३ एच पी फाल्कन कंपनीची इलेक्ट्रीक ट्युबेल मोटर जु.वा.कि.अ. ०५)५०००/-रुपये किंमतीची २३० फुट लांबीची काळ्या रंगाची कॉपरची ट्युबेल वायर जु.या. कि.अ. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.




No comments