काटेल धाम येथे स्वाभिमानीचा संवाद मेळावा संपन्न.. शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांना साथ द्या.राजु शेट्टी.. नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- अ...
काटेल धाम येथे स्वाभिमानीचा संवाद मेळावा संपन्न..
शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांना साथ द्या.राजु शेट्टी..
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
संग्रामपूर :- तालुक्यातील काटेल धाम येथे मा.खासदार राजु शेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्रातील ४ ते ५ हजार प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचि संवाद मेळावा पार पडला.
सरकार आयात निर्यातीचे धोरण करून शेतात काबाड कष्ट करून पिकवलेल्या मालाचे भाव पाडत आहे तसेच सामान्य जनतेकडून जीएसटीच्या रूपातून दिलेल्या करातून सरकारची तिजोरी भरत असते व याच खर्चातून राज्यात विकास कामे केली जातात .पण ही विकास कामे आम्हीच करत आहोत असा आभास व प्रचार सध्याचे आमदार खासदार करत असून जनतेची दिशाभूल करत आहेत.
म्हणुन शेतकरी शेतमजुरांची पाठराखण करणाऱ्यां प्रशांत डिक्कर सारख्यांना सहकार्य करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा .राजू शेट्टी यांनी आज संतनगरी काटेल धाम येथे पार पडलेल्या संवाद मेळाव्यात बोलताना केले . स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या पुढाकारातून जळगाव जामोद मतदारसंघ क्षेत्रातील या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
म्हणुनच तुमचे हित जोपासणाऱ्यांच साथ दया व श्री संत गुलाब बाबा यांना साक्षी मानून प्रशांत डिक्कर यांना आमदार करण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे रहा असे यावेळी राजू शेट्टींनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना भावनिक साद घातली . तर स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात पात्र शेतकऱ्यांना डावलून काही भाजपा चे कार्यकर्ते व मर्जीतील लोकांना सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रुपयाचा निधी वाटल्या गेला व यासाठी सत्तेचा कसा दुरुपयोग केल्या गेला हे उदाहरणा सह सांगुन ; या कोट्यावधीच्या बोगस अनुदान वाटपात सामील असलेले राजकीय व प्रशासनातील मासे कारवाई च्या गळाला अटकलेच पाहिजे अशी मागणी व्यक्त केली.
यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप प्रा प्रकाश पोपळे नांदेड वंदना डिक्कर , उज्वल चोपडे, गोपाल तायडे यांची भाषणे झाली . यावेळी संग्रामपूर तालुका भोई समाजाच्या वतीने प्रशांत डिक्कर यांना विधानसभा निवडणुकीसाठी २० हजार रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला . तर पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामात जळगाव जामोद मतदारसंघातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल असा संकल्प प्रशांत डिक्कर यांनी यावेळी जाहीर भाषणातून व्यक्त केला .
No comments