बारा बलुतेदार अठरापगड जाती जमातींचा ईच्छापुर्ती गणपती मंदिर येथे मेळावा संपन्न. प्रतिनिधी धुळे (संपादक :- हेमकांत गायकवाड) बारा बलुतेदार...
बारा बलुतेदार अठरापगड जाती जमातींचा ईच्छापुर्ती गणपती मंदिर येथे मेळावा संपन्न.
प्रतिनिधी धुळे
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
बारा बलुतेदार अठरापगड जाती जमातींचा ईच्छापुर्ती गणपती मंदिर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदरील मेळाव्याचे आयोजक - अनिलशेठ जैन वणी, अभिलाल दादा देवरे सुट्रेपाडा, शांताराम दुकळे, अरुण मासुळे, विलास गर्दे, सुवर्णा गर्दे, ज्ञानेश्वर हातगिर तसेच अठरापगड जातींचे जेष्ठ व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात एससी, एसटी, एनटी ओबीसी व अठरापगड जातींवर धुळे जिल्ह्यातील प्रस्थापित लोक आपल्यावर सामाजिक, शैक्षिणक व राजकीय अन्याय करत असल्याचे आपल्या मनोगतातुन अभिलाल दादा देवरे यांनी सांगितले यासाठी आपण सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावे, आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी असे आव्हान केले.

No comments