फैजपूर येथे अल-खिजर सोसायटी तर्फे गुणवंत विदयार्थ्यांना आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते सन्मान फैजपूर :- प्रतिनिधी :- इदू पिंजारी (संपादक...
फैजपूर येथे अल-खिजर सोसायटी तर्फे गुणवंत विदयार्थ्यांना आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते सन्मान
फैजपूर :- प्रतिनिधी :- इदू पिंजारी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल रावेर तालुक्यातील अल-खिजर सोसायटी फैजपूर येथे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या तालिब-ए-इल्मो साठी बक्षीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी होते, इकरा एज्युकेशन सोसायटी सदर अल्हाज अब्दुल करीम सालार साहेब, डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन अल्हाज डॉ.हारुन शेख , फैजपूर पोलीस स्टेशन PSI सैयद मोहिउद्दीन साहेब , सैयद जाविद जनाब मारूळ , गटनेता कलीम मणियार माजी नगरसेवक शेख रियाज, इस्माईल पहेलवान रसलपूर , यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबिद मलिक सर, प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष शेख अलीम भाई, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, गणेश गुरव सर, पत्रकार इदू पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते मुशीर मिस्त्री, जामा मस्जिद ट्रस्ट फिरोज खान, लिमरा सोसायटीचे अध्यक्ष वसीम जनाब, राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ता भाई शाकिर , समाजसेवक शाहरुख, डॉ.मोहम्मद रियाज, समाजसेवक इलियास टेलर, समाजसेवक इम्रान पटेल, खाटीक बिरादरी शहर अध्यक्ष साजिद खाटीक, रमीज सर चिनावल आदींनी कार्यक्रम चांदण्या रात्रीसारखा उजळून ठेवला. बोलणाऱ्या पाहुण्यांनी अल खिझर सोसायटीला आशीर्वाद दिले आणि मुलांना प्रोत्साहन दिले,
तसेच यावर्षीच्या शिष्यवृत्ती २०२४ च्या गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक २ मधील १० तालिब-ए-इल्म मुलांना ट्रॉफी देऊन सन्मानित पाहुण्यांच्या हस्ते प्रोत्साहन देण्यात आले. यासोबतच या मुलांचे मार्गदर्शक व मास्तर मोहम्मद साजिद इक्बाल, मुख्याध्यापक सय्यद दिल फारोज अली, उपशिक्षक सय्यद वसिक अली, अफजल खान सर, या मास्तरांचा सत्कार आमदार शिरीष चौधरी, करीम सालार, पीएसआय सय्यद मोईउद्दीन,यांनी केला. हाजी हारून सेठ, जाविद सर यांनी शाल व पुष्पहार अर्पण केला.
१) अन्शारा नाज सय्यद दिलफ्रोज अली.
२) बरीरा अमान शेख सलीम
३) नुजहत बी शेख इलियास
४) सोबिया बी शेख जाविद
५) नूर फातेमा शरीफ शाह
६) लैबा अंजुम अख्तर खा
७) तस्मिया शेख ए. जमाल
८) फातेमा शेख सादिक मोमीन
९) अलीना नांज अल्ताफ खान
१०) बुशरा बी आरिफ मोमीन
या वेळी कार्यक्रमात गुणवंत विदयार्थी-विद्यार्थिनींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व कार्यक्रर्माचे आभार अल-खिजर वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष डॉ. दानिश शे.निसार यांनी मानले, तर शेवटी सूत्र संचालन व आभार मुजम्मील काझी व एजाज सर यांनी मानले.



No comments