वडती गावात खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव साजरा श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या दोन दिवसीय कानबाईचा हा उत्सव खान्देशात उत्साहाने ...
वडती गावात खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव साजरा
श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या दोन दिवसीय कानबाईचा हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वडती
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव वडती येथे साजरा श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या दोन दिवसीय कानबाईचा हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो.
खान्देशाच कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव वडती येथे साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप महाजन, नंदलाल वाणी, रविंद्र वाणी, दिनकर पाटील, यांनी नवसपूर्ती साठी त्यांनी कानबाई मातेची स्थापना केली. तर कानबाई माता ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते.
खानदेशातील ब्राह्मण, वाणी, मराठा, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार आदी समाजबांधव श्रावणातील शुक्ल पक्षात कानबाईची पूजा करतात.
कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने 'नवसपूर्ती' करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात. खान्देशाच कुलदैवत म्हणून कानबाई मातेचा उत्सवाला सुरुवात ही नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या रविवारी साजरा केला जातो विशेष म्हणजे हा सण फक्त खांन्देशातच साजरा केला जातो या उत्सवाला घरापासून बाहेरगावी नोकरीसाठी गेले नातलग भाऊबंद एकत्र येऊन कानबाई मातेची सेवा करतात.
No comments