माझ्या मालकीचा प्लॉट मला मिळून द्या अन्यथा आत्मदहन करेल ..... माणिक नाथाजी डोंगरदिवे . नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वाशीम (संप...
माझ्या मालकीचा प्लॉट मला मिळून द्या अन्यथा आत्मदहन करेल ..... माणिक नाथाजी डोंगरदिवे .
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वाशीम
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मौजे तामसी तालुका जिल्हा वाशिम येथील माणिक नाथाजी डोंगरदिवे या ३३ वर्षीय तरुणाची स्वतःच्या मालकीची जागा गावातीलच गावगुंड यांनी बळजबरीने अतिक्रमण करून ताब्यात घेऊन त्यांना गावातून जाण्यास सांगितले आहे . तरी माणिक नाथाजी डोंगरदिवे या तरुणाने एस.पी ऑफिस वाशिम यांना माझी जागी जागा माझ्या ताब्यात द्या यासाठी अर्ज केला आहे.
तरी एस पी साहेबांनी आपल्या जागे संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे . सविस्तर वृत्त असे की मौजे , तामसी येथील मानिक नाथाजी डोंगरदिवे वय वर्ष ३३ या तरुणाची तामसी येथील गट नंबर ५५७ ग्रामपंचायत येथील वडिलांच्या मालकीची असणारी ४५ फुट लांब व ४० फूट रुंद असणारी जागा तारेचे कंपाउंड तोडून गावातीलच काही गावगुंडांनी जबरदस्तीने अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे
व त्यावर अवैद्य दारूचे व्यवसाय सुरू केला आहे आहे असा आरोप त्या जागेचा मालक असणाऱ्या नाथाजी डोंगरदिवे या वयोवृद्ध इसमाचा मुलगा माणिक नाथाजी डोंगरदिवे या ३०वर्षीय तरुणाने केला आहे . यावेळी या तरुणाने असे निवेदनद्वारे सांगितले आहे की मी गेल्या ३० ते ४० वर्षापासून या गावात राहतो माझे बाबा शेतीचे काम करतात. माझ्या घराच्या बाजूला माझ्याच प्लॉटवर गावातील काही गाव गुंडांनी जबरदस्तीने प्लॉट घेतला आहे घेतला आहे .
मी त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आलो असता तत्कालीन ठाणेदार प्रमोद इंगळे साहेब यांनी माझी कैफियत न ऐकता मला कोर्टात जाण्यास सांगितले आणि बीट जमदार बावनकुळे यांनी सुद्धा आम्हाला कोर्टात जायला सांगितले. त्यामुळे आमचे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे .
पोलिसांनी मला माझ्याच मालकीच्या जागेपासून वंचित राहण्यासाठी मजबूर केले आहे. त्यामुळे आता मला व माझ्या कुटुंबाला आत्मदहन किंवा आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारची विनवणी या निवेदनाद्वारे माणिक नाथाजी डोंगरदिवे यांनी केली आहे आणि असे यांनी नमूद केले आहे की जर माझी जमीन मला न मिळाल्यास येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे मी आत्मदहन करेल किंवा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारेल.
त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी , जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी मला न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची विनंती वजा मागणी माणिक नाथाजी डोंगरदिवे यांनी केली आहे. तरी लवकरात लवकर माझा प्लॉट मला न मिळाल्यास मी आत्मदहन किंवा आमरण उपोषण करेल अशी विनंती वजा मागणी या निवेदनाद्वारे माणिक नाथाजी डोंगर दिवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांच्याकडे केली आहे.
No comments