अबबब...... बॅंकेत लाडकी बहिण योजनेचा पहिल्या हप्त्याचे जमा पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-चोपडा (संपादक:- हेम...
अबबब...... बॅंकेत लाडकी बहिण योजनेचा पहिल्या हप्त्याचे जमा पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाकडून नुकताच लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला असून गुरुवारी १५ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुटी असल्याने व पुढे रक्षाबंधन हा सण असल्यामुळे शुक्रवारी व आज शनिवारी बँकेत महिला वर्गाची तुफान गर्दी पहायला मिळत असुन परत रविवारी सुटी असल्याने
शनिवारी म्हणजे आजच महिलांनी खुप गर्दी केली होती बँकेची स्थिती पहाता बँकेत पाय ठेवायला हि जागा शिल्लक नव्हती बँकेच्या बाहेर लांबचलांब रांगा लागल्या आहेत तरी ज्यांचे खात्यांवर अजून पर्यंत लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला नसुन लवकरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे तरी ज्यांचे बँकेत ज्यांचे शुल्लक काम असेल त्यांनी सध्या तरी बँकेत जाणं टाळावं असेच म्हणावे लागेल




No comments