माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न... लाभार्थी यांना त्यांची बँक खात्यावर दोन महिन्याचे रुपये तीन हजार इतकी रक्कम मिळण...
माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न...
लाभार्थी यांना त्यांची बँक खात्यावर दोन महिन्याचे रुपये तीन हजार इतकी रक्कम मिळण्यास सुरुवात
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-चोपडा
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुणे येथे माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न होत असताना आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम माननीय पालकमंत्री यांची उपस्थिती जळगाव येथे पार पडत असताना चोपडा तालुक्याचा तालुकास्तरीय कार्यक्रम नगरपालिकेच्या समिती सभागृहात संपन्न झाला...
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी भगिनींची उपस्थिती होती ...
कार्यक्रमास विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे अध्यक्ष श्री नामदेव पाटील व सदस्य श्री विकास पाटील, श्री गोरख कोळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात मुख्याधिकारी राहुल पाटील, संरक्षण अधिकारी आशिष पवार, पर्यवेक्षिका आदी उपस्थित होते...
समितीचे अध्यक्ष यांनी या आठवड्यामध्ये ग्रामीण भागात वेगवेगळ्या गावांना दौरे करून लाभार्थींची मते जाणून घेतली यावेळी ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला तसेच भगिनींना पेढे वाटप करण्यात आले...
लाभार्थी यांना त्यांची बँक खात्यावर दोन महिन्याचे रुपये तीन हजार इतकी रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असून उर्वरित लाभार्थी यांना देखील रक्षाबंधनापूर्वी रक्कम मिळणार असल्याचे समिती अध्यक्ष व सदस्य त्यांचे दौऱ्या दरम्यान तसेच आजच्या तालुकास्तरीय कार्यक्रमात सूचित केलेले आहे...
लाभार्थ्यांनी प्राप्त रकमेचा दैनंदिन प्रपंचासाठी योग्य उपयोग करून घ्यावा तसेच लगेचच बँकेतून रकमा काढण्याऐवजी त्या शिल्लक ठेवाव्यात जेणेकरून त्या रकमा भविष्यातील मोठ्या गरजा जसे मुलांचे शिक्षण किंवा आजारपण यासाठी वापरता येईल...
या योजने संदर्भात अतिशय कमी कागदपत्रांची आवश्यकता असून उत्पन्नाचा दाखला किंवा अनेक कागदपत्रांसाठी सेतू केंद्र यांचेकडे गर्दी करण्याची आवश्यकता नाही असेही अध्यक्ष यांनी आवाहन केले...
उपस्थित भगिनी यांनी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांना राखी बांधून त्यांचे आभार मानले...
यावेळी काही उच्च शिक्षित भगिनींनी त्यांना मिळालेले रकमांतून टॅब खरेदी किंवा रोजगारासाठी साहित्य खरेदी करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले...




No comments