कुसुंबा ता.चोपडा येथे दि.२३ रोजी बायजा आईची यात्रा गावातील ग्रामस्थांनी समस्त व्यापारी बंधूंनी उपस्थिती देण्याची केली नम्र विनंती गलंगी ...
कुसुंबा ता.चोपडा येथे दि.२३ रोजी बायजा आईची यात्रा
गावातील ग्रामस्थांनी समस्त व्यापारी बंधूंनी उपस्थिती देण्याची केली नम्र विनंती
गलंगी तालुका चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
गलंगी पासून जवळच असलेले कुसुंबा तालुका चोपडा येथील बायजा आई यांच्या यात्रेला शुक्रवार दिनांक २३ रोजी पिढ्यापासून चालत आलेल्या यात्रा निमित्त बारा गाडा ओढणे पासून तर भक्त पूर्ण गावात मिरवणुका काळेपर्यंत रात्री अकरा ते बारा पर्यंत चालूच असते व नंतर गावातील ग्रामस्थांसाठी व परिसरासाठी तमाशाचे आयोजन केले असते यावेळेस बंडु नाना धुळेकर यांच्या तमाशाचे आयोजन केले आहे यात्रा निमित्त बारा गाडे ओढण्याच्या मान परंपरा असून त्याच घरातले व्यक्तीला दिला असून यावेळी दीपक कैलास कोळी व गाळे बांधण्याच्या मान हा हा सुद्धा परंपरेनुसार भानू मोतीराम पाटील यांनाच मिळाला असून कुसुंबा तालुका चोपडा येथील यात्रा दि. २३ /८/२०२४ शुक्रवार रोजी भरण्याचे आयोजन केले असून व्यापारी वर्ग यांनी गावाची यात्रेच्या शोभा वाढवण्यासाठी आपला व्यवसाय घेऊन यावे ही गावकऱ्याकडून आग्रहाची विनंती केली आहे या यात्रेसाठी शिवाजी मित्र मंडळ वाल्मीक मित्र मंडळ एकलव्य मित्र मंडळ स्वामीनारायण मित्र मंडळ तरुण वर्ग व गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पिढ्यापासून यात्रेच्या उत्सव पार पाडला जातो तरी बाणेर परिसरातील भाविक भक्त यांनी यात्रेच्या लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली

No comments