adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील मुस्लीम युवकांचा शिवसेना शिंदे गटात जिल्हा प्रमुखांच्या उपस्थित जाहीर प्रवेश

  यावल येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जिल्हा प्रमुखांच्या उपस्थित जाहीर प्रवेश नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- शब्बीर खान यावल. (संपादक :...

 यावल येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जिल्हा प्रमुखांच्या उपस्थित जाहीर प्रवेश


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- शब्बीर खान यावल.

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तव्यदक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे) गटातमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झालेल्या बैठकीत यावल व परिसरातील आदिवासी तडवी युवकांनी व मुस्लिम बांधवांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना या पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे.या प्रवेश सोहळा कार्यक्रमास जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.या निमित्ताने जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणासंदर्भात विचार व्यक्त करीत पक्षाची भुमिका मांडली व सर्व शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे युवकांचे स्वागत केले व त्यांना भावी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार,यावल तालुका प्रमुख राजू काठोके,तालुका उपप्रमुख राम सोनवणे,यावल शहर प्रमुख पंकज बारी,सागर कोळी,राजू कोळी यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते

No comments