सुखप्रद फाउंडेशन नाशिक संचलित, एलिट क्लब यांच्यामार्फत पाच जिल्ह्यात भव्य अन्नदान व शैक्षणिक वाटप जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संप...
सुखप्रद फाउंडेशन नाशिक संचलित, एलिट क्लब यांच्यामार्फत पाच जिल्ह्यात भव्य अन्नदान व शैक्षणिक वाटप
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर सुखद फाउंडेशन नाशिक संचलित एलिट क्लब यांचा आशिया प्रोजेक्ट अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये अन्नदान शैक्षणिक वह्या पुस्तकांचे वाटप व गरीब वस्तीतील लोकांना मदत कार्य करण्यात आले. संस्थेअंतर्गत गेल्या तीन ते चार वर्षांपासून सामाजिक कार्य वेळोवेळी होत असते.
सुख परत फाउंडेशन व एलईडी क्लब यांच्यामार्फत यावर्षी नाशिक,पुणे,धुळे मनमाड, जळगाव अशा विविध शहरांमध्ये भव्य अन्नदान करण्यात आले. नाशिक शहरात वेगवेगळ्या गरीब वस्तीत तपोवन निलगिरी बाग पाथर्डी रोड पेठ रोड अशा गरीब वस्तीत अन्नदान करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैष्णव नगर जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुलांना शैक्षणिक वह्या पुस्तकांचे, स्कॉलरशिप अंकलीपी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
तसेच या सोबत वकृत्व स्पर्धेचे देखील विविध शहरांमध्ये आयोजन करून संवाद कौशल्य व प्रभावी वकृत्व विद्यार्थ्यांचे व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. या उपक्रमात सुखप्रद फाउंडेशनचे अध्यक्ष सुशीला शिरसाठ, एलिट क्लबचे संस्थापक अध्यक्ष तेजस शिरसाठ, व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments