Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात विनोद कोळी(शिवा भाईG) सन्मानित

  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात विनोद कोळी(शिवा भाईG) सन्मानित प्रतिनिधी चोपडा (संपादक :- हेमकांत गायकवाड )...

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात विनोद कोळी(शिवा भाईG) सन्मानित



प्रतिनिधी चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड )

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील खान्देश विभागीय अधिवेशनात खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाला नावलौकिक करून दिल्याबद्दल विनोद रामचंद्र कोळी (शिवाभाई G) यांचा सत्कार करण्यात आला. 


राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे , राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने यांच्या उपस्थिती मधे खान्देश विभागीय प्रसिध्दी प्रमुख विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G)यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी संघटनेचे पदाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाला नावलौकीक मिळवून दिल्याबाबत या अधिवेशनात विनोद कोळी यांना या कार्याबद्दल पाचोरा चे लोकप्रिय आमदार किशोर (अप्पा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याबाबत सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments