Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  तीन तासांतच सावदा पोलीसांनी संशयितांना केली अटक एक अल्पवयीन बाल न्यायालयात तर दोघांना पोलीस कोठडी  रावे...

 अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार 

तीन तासांतच सावदा पोलीसांनी संशयितांना केली अटक एक अल्पवयीन बाल न्यायालयात तर दोघांना पोलीस कोठडी 


रावेर प्रतिनिधि :- मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील सावदा येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिन्ही नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे संबंधित दोघांना न्यायालयात हजर केले असून त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एक संशयित  अल्पवयीन असून त्याला जळगांव बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सविस्तर असे की 

सावदा ते मस्कावद रस्त्यावरील एका शेतात तिघांनी अल्पवयीन मुलीला मामाच्या गावची ओळख असल्याचा फायदा घेत तुला घरी सोडून देतो असे सांगून सावदा ते मस्कावद शेत शिवारात फुस लाऊन अल्पवयीन पिडीत मुलीचा विनयभंग केला.

नंतर तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. या बाबतची तक्रार पिडीत मुलीच्या आईने सावदा पोलिस स्टेशनला केली. या बाबत सावदा पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना गांभीर्याने घेऊन सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी तातडीने तपासचक्रे फिरवून  ३ तासात या तिन्ही संशयितांना अटक करून ताब्यात घेतले.व त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले यातील दोघं सज्ञान संशयितांना  ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे व सावदा पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी केली

No comments