Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गावठी पिस्तुल दोन मॅगझीनसह एकास अटक रावेर पोलीस स्टेशन व एलसीबी ची संयुक्त कारवाई 22,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

  गावठी पिस्तुल  दोन मॅगझीनसह एकास अटक      रावेर पोलीस स्टेशन व एलसीबी ची संयुक्त कारवाई   22,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत  रावेर प्...

 गावठी पिस्तुल  दोन मॅगझीनसह एकास अटक   

 रावेर पोलीस स्टेशन व एलसीबी ची संयुक्त कारवाई  22,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत 


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जायस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रावेर दिनांक 25/09/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेको विष्णू बिऱ्हाडे, पोहेकों/विनोद पाटील, पोहेको ईश्वर देशमुख, पोकों/ राहुल महाजन स्थागुशा जळगांव, पोहेकों रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे,पथक  गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लार शहाबाबाच्या दर्याजवळ समोर एक इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी वर प्रमाणे पोलीस स्टॉफ रवाना होवून संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या 01 रिव्हाल्वर व 02 मॅगझिन असा एकुण 22,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यावरुन नामे अब्दुल अनिस अब्दुल मज्जीद वय 46 वर्ष रा. बडी खानका, मुस्लिम कॉलनी खडकारोड भुसावळ ता भुसावळ जि जळगांव यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही कामी घेवून आलो पोकों/ 708 राहुल कडू महाजन (स्थानिक गुन्हे शाखा जळगांव) यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 463/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लघन कलम 135 प्रमाणे व भारतीय न्यास संहिता कलम 223 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो, मा. श्री अशोख नखाते साहेब, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ.श्री विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, व स्थागुशा जळगांव चे पोहेकों/ विष्णू बि-हाळे, पोहेकों विनोद पाटील, पोहेकॉ ईश्वर देशमुख, पोकों/ राहुल महाजन यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

No comments