adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

25 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण आंदोलन करण्याबाबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन

 25 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण आंदोलन करण्याबाबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्...

 25 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण आंदोलन करण्याबाबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील पुरवठा विभाग व पंचायत समिती प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख इ.सर्व शासकीय कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर कारवाई होऊन सोयीस्कर रित्या सिटीझन चार्टर ( नागरिकांची सनद ) मिळावी म्हणून येणाऱ्या 25 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण आंदोलन करण्याबाबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.


कोणत्याही शासकीय/निमशासकीय कार्यालयात नागरिकांना ज्या सेवा सुविधा पुरविणे अपेक्षित असते त्या कोणत्या दर्जाच्या असाव्यात त्या किती वेळेत दिल्या जाव्यात.हा सर्वसामान्य नागरिकांना कायम सतावणारा प्रश्न असून ज्या नागरिकांच्या कराच्या पैशातून शासकीय कारभार चालतो त्या नागरिकांना दर्जेदार सेवा वेळेत देणे हे आपले कर्तव्य असताना प्रत्येक विभागात नागरिकांची सनद हे बोर्ड आपल्या विभागात असताना त्या पद्धतीची सेवा आपल्या शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्याकडून होत नाही अशा प्रकारची खंत तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

त्या मध्ये रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा असतील किंवा त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे पुरवठा विभागाकडून वेळेत निरसन झाले पाहिजे तसेच वर्डी गावातील ग्रामसेवक श्री.कुमावत यांच्या शासकीय कार्यभारावरती प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले.त्या स्वरुपाचे सविस्तर निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहराध्यक्ष गिरीश देशमुख, जिल्हा संघटक व सचिव परेश देशमुख,युवक शहराध्यक्ष शुभम सोनवणे,सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष मिलिंद सोनवणे,शहर उपाध्यक्ष गोपाल दाभाडे,जिल्हा युवक उपाध्यक्ष सनी सचदेव,महिला शहराध्यक्ष स्वातीताई बडगुजर,मिलिंद बडगुजर,अंकित सोनवणे उपस्थित होते.

No comments