आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात चोपडा तालुका व शहर जि.जळगाव काँग्रेसचे जोरदार निदर्शने व गुन्हा दाखल करण्याची मागणी ...
आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात चोपडा तालुका व शहर जि.जळगाव काँग्रेसचे जोरदार निदर्शने व गुन्हा दाखल करण्याची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात चोपडा तालुका व शहर जि.जळगाव काँग्रेसचे जोरदार निदर्शने व गुन्हा दाखल करण्याची मागणी दि.१९/०९/२०२४ वार गुरुवार रोजी दुपारी ठीक ०१ : ०० वाजता चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांनी केलेले बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होवुन गुन्हा दाखल व्हावा व त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या व त्यांचा निषेध करण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भैय्यासाो,अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले,तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री देवरे यांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश सिताराम पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद जुलाल पाटील,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे,माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी सर,शेख आरिफ शेख सिद्दिकी,फातिमाबी पठाण,ग.स.चे माजी संचालक रमेश एकनाथ शिंदे,चोपडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोपाल नवल धनगर,सूतगिरणी संचालक राजेंद्र भास्कर पाटील,देविदास सोनवणे,सुनील बागुले,वजाहत अली काझी,चोसाका संचालक शरद धनगर,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील,मीर आबिद अली,संजय बोरसे,गुलाब बारेला,लक्ष्मण कावीरे,देवकांत चौधरी,इलियाज पटेल,सतीश पाटील,अनिल पाटील,एन.एस.यु.आय.प्रदेश
सचिव चेतन बाविस्कर,युवराज पाटील,यशवंत खैरनार,शिरीष पाटील,देविदास साळुंखे,प्रताप सोनवणे,मोहन पाटील,विलास दारुंटे,गफ्फार अली रौनक अली इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments