adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे25रोजी सत्यमेव जयते आंदोलन.

  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे25रोजी सत्यमेव जयते आंदोलन.   बाळासाहेब पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह करणार उपोषण. चोपडा प्रतिनिधी (संपादक :-हेमका...

 राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे25रोजी सत्यमेव जयते आंदोलन.

 बाळासाहेब पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह करणार उपोषण.


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

चोपडा:--चोपडा तालुक्यातील पुरवठा विभाग पंचायत समिती,बांधकाम विभाग, भूमिअभिलेख विभाग, सिंचन विभाग,व जेवढ्याही शासकीय कार्यालयात जिथेजिथे अधिकारी व कर्मचारी जनतेची पिळवणूक करतात,काम वेळेवर करत नाहीत,सर्वसामान्य जनतेची दखल घेत नाही त्या त्या विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय उर्फ बाळासाहेब पाटील (वर्डी)यांच्या सह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र उपोषण करणार असून जास्तीत जास्त संख्येने उपोषण स्थळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

       चोपडा तालुक्यात पहिल्यांदाच सत्यमेव जयते आंदोलन होत असून तश्या आशयाचे पत्र तहसीलदार भाऊसाहेब थोरात व बीडीओ रमेश वाघ यांना देण्यात आले आहे.

      रेशनकार्ड साठी दररोज शेकडो लोक चकरा मारतात,एकाच दुकानदाराकडे जास्तीचे रेशन दुकान कसे?तो प्रत्येक व्यक्तीचे थंब का घेत नाही?त्यांचे थंब मशिन वेळेवर सुरू नसते ते लोकांना वेळ बनवून वेळ मारून नेतात.त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयांना नागरिकांची सनद मिळावी अश्या अनेक मागण्यासाठी ते उपोषणाला बसणार आहेत.

चाहार्डी व वर्डी येथील ग्रामसेवक कुमावत यांच्या मनमानी कारभाराविषयी व बदली संदर्भात वारंवार तक्रार देऊन ही त्यांची बदली का होत नाही?ग्रामसेवक कुमावत हे गावात हजर नसतात.गावातील नागरिकांना दाखले देत नाही त्यासंदर्भात तात्काळ ग्रामसेवक यांची बदली झालीच पाहीजे ग्रामसेवक कुमावत हे स्वतः ठेकेदार होऊन काम करतात,पाणीपुरवठा विभागातून एकाच दिवशी 15लाख रुपयांचे साहित्य खरेदी कसे करतात,नागरिकांना शिव्या देऊन धमकवून गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात स्वतःच एमबी तयार करतात त्यांना अधिकार कोणी दिला? अश्या विविध मागण्यासाठी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहर अध्यक्ष गिरीश देशमुख,जिल्हा संघटक परेश देशमुख, उपजिल्हाध्यक्ष सनी सचदेव महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर,युवक शहर अध्यक्ष शुभम सोनवणे,सामाजीक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मिलिंद सोनवणे,उपाध्यक्ष गोपाल दाभाडे,सरचिटणीस सुरेश साळुंखे, अंकीत सोनवणे,यांनी उपोषणाबद्दल पत्र दिले असून दिनांक 25रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात 11वाजेपासून उपोषणाला बसणार आहेत.जोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अस उपोषणकर्ते बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

No comments