रावेर,धुरखेडा येथे, भिम आर्मी भारत एकता मिशन यांच्या तर्फे सभा संपन्न रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक :- हेमकांत गायकवाड) रा...
रावेर,धुरखेडा येथे, भिम आर्मी भारत एकता मिशन यांच्या तर्फे सभा संपन्न
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील धुरखेडा गावात अनेक वर्षा पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार होणे करीता 22/09/2024 रोजी भिम आर्मी भारत एकता मिशन तर्फे धुरखेडा येथे सभा घेण्यात आली. भिम आर्मी भारत एकता मिशन ,जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा घेण्यात आली, यावेळी , सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थितीत सर्वांशी चर्चा केली, प्रवेशद्वार बांधण्यात यावे अशी विनंती केली आहे, आणि जर याप्रकरणी राजकारण केले तर ,भिम आर्मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन प्रवेशद्वार फलक लावणार असल्याची माहिती, भिम आर्मी भारत मिशन, रावेर तालुका प्रमुख राहुल निंभोरे व उपतालुका प्रमुख जुम्मा तडवी , भिम आर्मी सदस्य बगाडे यांनी केली.

No comments