adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय दि. 9 जुलै 2024 नुसार चोपडा पंचायत समिती अंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थीच्या निवडीचे आदेश

मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय दि. 9 जुलै 2024 नुसार चोपडा पंचायत समिती अंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्ष...

मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय दि. 9 जुलै 2024 नुसार चोपडा पंचायत समिती अंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थीच्या निवडीचे आदेश


चोपडा प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय दि. 9 जुलै 2024 नुसार चोपडा पंचायत समिती अंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थीच्या निवडीचे आदेश आज रोजी चोपडा तालुक्याचे आमदार मा. ताईसाहेब सौ. लताताई सोनवणे यांचे शुभहस्ते निवड आदेश वाटप करण्यात आलेत


.

      मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत चोपडा पंचायत समिती अंतर्गत मराठी व उर्दू माध्यमांच्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळांमध्ये एकूण 122 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना व पंचायत समिती अंतर्गत 20  ग्रामपंचायतीत युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवडीचे आदेश आज रोजी शासकीय विश्रामगृह चोपडा येथे एका शासकीय कार्यक्रमात चोपडा तालुक्याच्या आमदार मा. ताईसाहेब सौ. लताताई सोनवणे यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आलेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे हे उपस्थित होते.


     निवड आदेश वाटप कार्यक्रमात माजी आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेत विविध प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा लाभ घेवून आपले कौशल्य याबाबतीत विकसित करावे असे आवाहन तरुणांना केले.  चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. रमेश वाघ साहेब यांनी या योजनेबद्दलचे स्वरुप, कार्यपद्धती, कालावधी व अंमलबजावणीबाबत  सविस्तर मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती मा. एम.व्ही. पाटील सर, चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. भाऊसो. नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, श्री. सागरभाऊ ओतारी, श्री. कैलास बाविस्कर, श्री. रावसाहेब पाटील, संचालक गोपाल पाटील शिवराज पाटील, किरण देवराज, विजय पाटील नामदेव पाटील, व कुणाल पाटील गणेश पाटील, दिपक चौधरी, गोरख कोळी अन्नु ठाकुर, हरीष पवार, श्री. गणेश पाटील, श्री. एस.आर. पाटील सर हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व युवा प्रशिक्षणार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

      कार्यक्रमाचे नियोजन चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. अविनाश पाटील, केंद्रप्रमुख श्री. नरेंद्र सोनवणे, श्री. उत्तम चव्हाण, श्री. देवेंद्र पाटील, सौ. वैशालीताई पाटील, यांनी केले. सूत्रसंचालन श्री. प्रशांत सोनवणे यांनी केले. कार्यक्रम सशस्वीतेसाठी श्री. रविराज शिंदे, श्री. जीवनलाल वाडीले, समन्वयक श्री. समाधान कोळी, तालुका पेसा समन्वयक श्री.प्रदिप बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

No comments