हिंगोणा ते मोरधरण मुख्य रस्त्याचे खडडयामुळे वाजले बारा अपघाताला देते आमंत्रण ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची ...
हिंगोणा ते मोरधरण मुख्य रस्त्याचे खडडयामुळे वाजले बारा अपघाताला देते आमंत्रण
ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची मागणी.
हिंगोणा ( प्रतिनिधी ) हिंगोणा ते मारधरण रस्ता , न्हावी फाटा रस्त्यावर मध्यभागी भर पावसाळ्यात मोठ मोठे खड़्डे पाण्याच्या डबक्याने साचलेले असुन सदरील रस्तावर अपघाताला आमंत्रण देणारे जिवेघेणे खड्डयांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न ग्रामस्थ व वाहनधारकांमध्ये उपस्थित होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी मुख्य बाजार चौकात ग्रामपंचायत समोर मोठमोठी खड्डे निर्माण झाली आहे.हिंगोणा येथिल मुख्य बाजार चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते ,दरम्यान या खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वारंवार अनेक वेळा दुचाकी वाहनांचे अपघात होत असतात. अनेकांना अपघातामुळे मिळालेल्या दुखापतीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारक आणि नागरीकांच्या वतीने अनेक वेळा यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी हे या अतिशय गंभीर अशा विषयाकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसुन येत आहे . तरी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी किंवा हिंगोणा ग्राम पंचायत प्रशासनाने यांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांना दुरूस्त करण्यासाठी पाऊल उचलावी अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर या खड्डा मधे तात्काळ खडीमुरुम टाकावे अशी मागणी हिंगोणा येथील ग्रामस्थानं ' कडून होत .आहे

No comments