ह भ प श्री संजयजी महाराज पाचपोर यांचे हस्ते धुपेश्वर संस्थान येथे शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे उदघाट्न बुलढाणा प्रतिनिधी (संपादक:- हेम...
ह भ प श्री संजयजी महाराज पाचपोर यांचे हस्ते धुपेश्वर संस्थान येथे शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे उदघाट्न
बुलढाणा प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर संस्थान येथे दिनांक१८ सप्टे २४ रोजी ह भ प श्री संजय जी महाराज पाचपोर यांचे हस्ते शतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.
नुकताच श्री संजय जी महाराज पाचपोर यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणारा आध्यात्मिक क्षेत्रातील संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.त्या अनुषंगाने मलकापूर व नांदुरा वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या वतीने धुपेश्वर संस्थान येथे सत्कार समारंभचे आयोजन करण्यात आले होते. निंबादेवी निंबोळा संस्थान,शंकरगिरी महाराज संस्थान पळशी झाशी यांनातर धुपेश्वर संस्थान येथे आज धार्मिक स्थळी तिसऱ्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे उदघाटन झाले.
गरीब शेतकऱ्यांची मुले मुंबई पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाही त्यांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या माध्यमातून राजेश गावंडे यांचा प्रयत्न असतो, त्यासाठी त्या गावात किंवा धार्मिक स्थळी जाऊन जागेच्या उपलब्धतेनुसार त्या मंडळींना आवाहन करीत असतात. अभ्यासिकेसाठी ते स्वतः स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणाऱ्या पुस्तकाच्या उपलबधतेसाठी नेहमी तत्पर असतात तसेच इतरांना आवाहन करीत असतात.नांदुरा येथील शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेतून दोनशे च्या वर विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. निंबोळा येथील अभ्यासिकेतून सुद्धा बरेच विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू झाले आहेत.
अभ्यासिकेचे उद्घाटन केल्यानंतर राजेश गावंडे आणि त्यांच्या संघटनेसोबत आम्ही नेहमी तत्पर राहू अशी यावेळी महाराजनी ग्वाही दिली, तसेच इतरही संस्थानांनी या संस्थांन चा आदर्श घ्यावा.असे महाराजानी आवाहन केले.
यावेळी अनेक साधू, महंत,
महामंडलेश्वर महाराज, मुक्ताई संस्थांन चे ह भ प हरणे महाराज, शास्त्री महाराज
धुपेश्वर संस्थांनचे अध्यक्ष महेंद्रसिंग रावळ, व्यवस्थापक तेजराव रायपुरे
तसेच शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे राजेश गावंडे,कोमल ताई सचिन तायडे,प्रज्ञा ताई तांदळे, पद्माकर ढोले,अक्षय बोचरे,गोपाल रायपुरे, योगेश पाटील,गायत्री साळुंखे,तसेच ह भ प रामभाऊ महाराज झांबरे अनेक वारकरी मंडळी, विद्यार्थी आणि भक्त गण उपस्थित होते

No comments