adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे होत आहेत हाल

  धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे होत आहेत हाल     चोपडा (प्रतिनिधी) (संपादक :- हेमकांत गायकवाड)        ...

 धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे होत आहेत हाल


    चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

       तालुक्यातील धानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या गावाशी बऱ्याचशि गावे आदिवासी वाङा पाडे जोडलेले आहेत परंतु धानोरा येथे बऱ्याच वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कायम स्वरूपी निवासी डॉक्टर नसल्यामुळे गरिब आदिवासी तसेच इतर  रूग्णांना दुपारनंतर खाजगी दवाखान्यात जावे लागते  त्यामुळे गरिब रूग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे

  ङाॅक्टर बाहेर गावाहून सकाळी 9 ते 10 वाजेला प्रा आ केंद्रांत येतात व दुपारी 12 वाजेलाच आपापल्या घरि निघून जातात मग दुसर्या दिवशी सकाळच्या 9/10 वाजेपर्यंत दवाखाना आरोग्य सेविकांच्या भरवशावर अवलंबून राहात असतो अशा वेळी ङाॅक्टरां च्या अनुपस्थितीत जर अतिजोखमिचा  पेशंट आला म्हणजे त्याला एकतर माघारी पाठवितात नाहीतर जळगावला जाण्याचा सल्ला देतात   मागेच एक आदिवासी महिला नबाबाई समीर पावरा ही 19 मे 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता तसेच अजून एक आदिवासी महिला आरोग्य केंद्रातून सोय सुविधा नसल्या कारणाने पेशंट अर्ध्या रात्रीच पसार झाले होते त्यावेळेस पण आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती,आरोग्य केंद्रात  पिण्याचे पाणी व स्वच्छतेचा नेहेमीच अभाव असतो

,प्रसुतीस गेलेल्या महिलांना आहार मिळतच नाही 

, मानव विकास कार्यक्रमा करिता लाभार्थ्यांना दवाखान्यात ने आण करण्या करिता वाहण ग्रामीण भागात वेळेवर येत नाही

, बिङगाव उप केंद्रांत निवासी आरोग्य सेविका नाही

, ग्रामीण भागात जखमीच्या किंवा साथीचे आजारांच्या ठिकाणी निवासि ङाॅक्टर जात नाही 

, प्रसुती च्या यातनांबाबत आशाताई च्या फोन नंतरही शासकीय वाहन ग्रामीण भागात वेळेवर पोहंचत नाही 

अशावेळी वाहन वेळेवर न,दवाखान्यात दोन ङाॅक्टर असतांना एका ङाॅक्टर ने ग्रामीण भागात फिरत्या दवाखान्याच्या  रूपात खेडोपाडी आरोग्याची  सुविधां ऊपलब्ध करावी .शासकीय वाहन प्रसुत लाभार्थी पर्यंत पोहोचण्याचा अभाव व मुख्यालयात ङाॅक्टरांची अनुपस्थिती या मुळेच बहुतेक वेळा लाभार्थी दगावतात व लाभार्थी व आशाताई मिळणार्‍या लाभापासून वंचित राहतात 


अशा अनेक सुविधांचा अभाव येथे केवळ निवासी डॉक्टर नसल्यामुळेच पहावयास मिळतो

  स्वताहा मुख्यालयात न राहून नियमांची पायमल्ली करणारे ङाॅक्टर. काटेकोर पणे काम करणारे आरोग्य कर्मचारी व आशाताईंवर रोब जमवतात. आपल्या चुका व अपयशाचे खापर आशा वर्कर व कर्मचाऱ्यांच्या माती थोबतात 

ग्रामीण भागात माता अथवा बाल मृत्यू झाल्यास आशांना नाही तर  दस्तुर खुद्द ङाॅक्टर व आरोग्य सेविकेस जबाबदार ठरविल्यास आरोग्य सेवेत बऱ्यापैकी सुधारणा झालेली अनुभवयास मिळेल

No comments