डाक विभागामार्फत न्हावी येथे डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन शब्बीर खान (यावल प्रतिनिधी) (संपादक :- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील ग्राम पंचा...
डाक विभागामार्फत न्हावी येथे डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील ग्राम पंचायत कार्यालयाचा सभागृहामध्ये शनिवारी पोस्ट कार्यालयाकडून डाक चौपाल हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये नागरिकांसाठी केवायसी, पोस्ट खात्यातील बँकिंग खाते उघडणे, लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या योजना यांचे खाते उघडणे आदि सुबिधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. दिवसभरात या विषेक डाक चौपाल कार्यक्रमाचा लाभ 180 नागरिकांनी घेतला तर उपस्थित नागरिकांना डाक विभागाचा विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी न्हावी गावाचे सरपंच श्री. देवेंद्र भानुदास चोपडे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये न्हावी गावाचे उपसरपंच श्री. नदीम अयुब पिंजारी, यावल पंचायत समिती सदस्य श्री. सर्फराज सिकंदर तडवी, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. गफ्फुर इक्बाल खाटिक, श्री. रविंद्र रमेश तायडे यांची उपस्थिती होती. यावल उप विभागाचे डाक निरीक्षक श्री. डिगंबर चौधरी यांनी पोस्ट विभागाचा योजनांची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सचिन सावळे, वैभव येवले, ज्ञानेश्वर जगताप, धीरज राणे, लोकेश बोंडे, गजानन बोरनारे, रफिक तडवी, विशाल मोरे, नर्गिस जमादार, भाग्यश्री कुयते, आकाश कोष्टी, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन श्री. राजस धर्माधिकारी यांनी केले.
No comments