शिव जनस्वराज्य यात्रेला उदंड प्रतिसाद. गावा गावात यात्रेचे शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत. अमोल बावस्कार:- बुलढाणा (संपादक:- हेमकांत गायकवाड) श...
शिव जनस्वराज्य यात्रेला उदंड प्रतिसाद.
गावा गावात यात्रेचे शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत.
अमोल बावस्कार:- बुलढाणा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
शेगाव/कापुस सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिक विम्याच्या सह विविध मागण्यासाठी जिल्ह्यात निघालेल्या शिव जनस्वराज्य यात्रेला गावा गावात शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छातीला माती लावून सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे रस्त्यावर उतरून यात्रेला सुरुवात केली आहे.
कापुस सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई सह विविध मागण्यासाठी निघालेल्या यात्रेचा महामेळावा २० सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसिलच्या मैदानावर होणार असून या मेळाव्याला लाखा पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे नियोजन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे बोलल्या जात आहे. यात्रेचे गावा गावात कुठे बॅंड लावुन तर कुठे टाळ मृदंगच्या गजरात वाजत गाजत रंग रांगोळ्या काढून महिला बघिणी कडुन औक्षण करत यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे. स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून गोर गरीबांच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या यात्रेने शेतकरी, शेतमजुरांच्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या आहेत. आज शिव जनस्वराज्य यात्रा तिसऱ्या दिवशी संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा,वरवट खं,सावळी,हिंगणा,भोन, देऊळगाव,टाकळी,आस्वंद, कुंदेगाव,कोद्री,अवार, इत्यादी गावात जाऊन सायंकाळी ७ वाजता आठवडी बाजार पातुर्डा येथे जाहीर सभा होणार आहे.


No comments