वाळू माफियावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई कोल्हापूर कारागृहात रवानगी फैजपुर पोलीसांनी पाठविला होता कारवाईसाठी प्रस्ताव राव...
वाळू माफियावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई कोल्हापूर कारागृहात रवानगी फैजपुर पोलीसांनी पाठविला होता कारवाईसाठी प्रस्ताव
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हयांतील फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड वरील वाळू माफिया गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्या
अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. १) फैजपूर पो. स्टे. हद्दीतील स्थानबद्ध इसम ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी वय ३६ रा. कोळन्हावी ता.यावल जि. जळगाव याचे विरुध्द भादंवि कायद्या अंतर्गत ०९ गुन्हे दाखल आहेत.सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये "वाळू तस्कर" या संज्ञेत प्रस्ताव हा फैजपूर पो.स्टे. चे सहाय्यक . पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.०८/०८/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्ताबाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता.त्यानुसार दि.०५/०९/२०२४ रोजी जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कडील आदेश क्र.दंडप्र कावि/एमपीडीए/३४/२०२४ अन्वये संबंधितास कोल्हापूर जि. कोल्हापूर या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार फैजपूर पो.स्टे.चे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक, निलेश वाघ, सहा. पोलीस निरीक्षक, रामेश्वर मोताळे, पोउनि. मैनुद्दीन सैय्यद, सफौ योगेद्र मालविया, पोहेकों योगेश महाजन, पोना/समाधान पाटील, पो कॉ/नावकर, पोहेकॉ/अनिल पाटील अशांनी स्थानबध्द इसमास दि.०६/०९/२०२४ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर जि. कोल्हापूर येथे दाखल करण्यासाठी रवाना झाले आहे.
वरील स्थानबध्द इसमाचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी सुध्दा त्याचे वर्तनात सुधारणा झाली नसून तो पुन्हा गुन्हे करण्याची सवय सुरुच ठेवली असल्याने
वरील एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे मा.डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहा. पोलीस अधीक्षक, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरी. बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोहेकॉ/सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ/जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ रफिक शेख कालु, पोहेकॉ/संदिप चव्हाण, पो कॉ/ईश्वर पंडीत पाटील यांनी कारवाईसाठी प्रयत्न केले

No comments