चौगावात ढगफुटी सदृश्य पाऊस गावात पाणी घुसल्याने गावातील वार्ड क्र.दोनचा दोन तासांसाठी चारही बाजूने संपर्क तुटला विश्राम तेले चौगाव (संप...
चौगावात ढगफुटी सदृश्य पाऊस
गावात पाणी घुसल्याने गावातील वार्ड क्र.दोनचा दोन तासांसाठी चारही बाजूने संपर्क तुटला
विश्राम तेले चौगाव
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आज दि.२/९/२०२४ सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गाव नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले तर दुसरीकडे त्रिवेणीकडे जाण्याऱ्या रस्त्यानेही
सकाळी सहा वाजता शेती शिवारातील पाणी गावात घुसल्याने गावातील वार्ड क्र.दोनचा दोन तासांसाठी चारही बाजूने संपर्क तुटला होता.सात वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नऊ वाजेपर्यंत पूर ओसरला.अचानकच चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने लोकांमध्ये खुपच भीतीचे वातावरण तयार झाले होते. सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नसली तरी शेतातील पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.




No comments