adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नायं

  धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राह...

 धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नायं

..... प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र 


बिड प्रतिनिधी

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

आज दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे सरकार व फडवणीस सरकार यांनी तातडीने करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे


धनगर जमातीच्या असलेल्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार सोमवार पासून उच्चशिक्षित तरुण अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे, माऊली हळणवर, दीपक केसरकर यशवंत गायके,तमनर हे आमरण उपोषणास बसलेले आहे आज त्यांचा आकरावा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालवली आहे


तरी या राज्य सरकारकडून धनगर समाज बांधवांसाठी त्वरित (ST) आरक्षणाचा अध्यादेश काढून धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत जर या राज्य सरकारने धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटी प्रमाणपत्र जर दिले नाहीत तर महाराष्ट्रातला दोन कोटी धनगर समाज हा शिंदे सरकार व देवेंद्र फडवणीस सरकार यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही याची या सरकारने दखल घ्यावी.

  धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी पाठक साहेब , व बीड तालुका जाधवर नायब तहसीलदार साहेब यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.धनगर समाजाची अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगर समाजाचे पंढरपूर येथे मोठे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणास राज्यभरातील राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती असे अनेक जण या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.




    सरकारने धनगडांचे दाखले तात्काळ रद्द करणे, जीआर काढणे, अभ्यास समितीचा अहवाल सादर करणे आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्ग (ST-A, ST-B) करणे या मुद्द्यावर बैठक घेऊन नवीन जीआर काढावा.

   महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर जातीचे खिलारे कुटुंब आहेत हे धनगड नसून हे धनगरच आहेत हे राज्य सरकारने सिद्ध करावे.

शिंदे सरकार व देवेंद्र फडवणीस सरकार यांनी धनगराच्या मुलांच्या हातात एसटीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे अन्यथा धनगर समाज हा शिंदे सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे यांनी बोलताना सांगितले.


   जर राज्यामध्ये धनगड जात अस्तित्वातच नाही तर धनगरांना एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रकाश भाई असून सगळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

  यावेळी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे महाभारत गावडे ,लिंबराज भोंडवे ,शितलताई मतकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष,भरत गाडे, जिल्हा प्रमुख,मोहन मैंदड,काळे अंगद, दिगंबर चादर, दादा घोडके तुळशीराम ढोरमारे, सरोदे सर, अरुण काकडे, शिवाजी डफळ, रामकिसन ठेंगल, विलास खांडेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.

No comments