सदगुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे ताण-तणाव मुक्त/ कॉपी मुक्त परिक्षा अभियान कार्यक्रम उत्साहात साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश ...
सदगुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे ताण-तणाव मुक्त/ कॉपी मुक्त परिक्षा अभियान कार्यक्रम उत्साहात साजरा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ताण-तणाव मुक्त/ कॉपी मुक्त परिक्षा अभियान कार्यक्रम दि. 13/09/24 वार शुक्रवार घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षमहा विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे या होत्या. तर कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ पाटील यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नेहमी आनंदी राहावे आणि आपले कार्य वेळच्या वेळे पूर्ण करावे,कोणत्याहीगोष्टीचीकाळजी करू नये. सांगितले प्रमुख मार्गदर्शक श्रीमती वैशाली तायडे शासकीय रुग्णालय जळगाव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व सांगीतले तसेच परीक्षेसाठी येणारा ताण तणाव दूर करण्यासाठी उपाय सुचविले मानसिक ताण कमी होण्यासाठी योगा व प्राणायाम करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता अभ्यासार्थी व्हावे. जीवनात कोणतीही समस्या आल्यास संयमाने सोडवण्यास प्रयत्न करावे व स्वतःतील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये तसेच परीक्षेतील काळात तणावमुक्त वातावरण निर्माण करावे आणि परीक्षेचे दडपण न घेता अभ्यास करून पेपर सोडवावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा अहिरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन विद्यार्थी शिक्षिका चंद्रालेखा पवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे डॉ. प्रतिभा पाटील डॉ अनिता जावे.डॉ जयश्री पाटील प्रा. सुवर्ण अहिरे प्रा. निधी शर्मा श्री अरविंद पवार श्री पंकज वाघ श्री चंद्रकांत सपकाळे व शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.

No comments